सर्वात वर

कैरीचा छुंदा …

शीतल पराग जोशी 

सध्या बाजारात कैऱ्या खूप मिळतात. तर वर्षभर त्या मिळत नाहीत. म्हणून असा हा छुंदा करून ठेवायचा. खूप टेस्टी लागतो. पराठे, दशमी, वरण भात याबरोबर हा आंबट गोड छुंदा खूप छान  लागतो.

साहित्य: 3 कैऱ्या, 4/5 वाटी साखर, 2 टीस्पून तिखट, 2 टीस्पून जिरे पावडर, मीठ

कृती: प्रथम कैरी स्वच्छ धुवून घ्यावी. त्यावरचे साल काढून घ्यावे. नंतर कैऱ्या किसून घ्याव्या. एक स्टीलचे पातेले घेऊन त्यात हा किस टाकावा. त्यात साखर टाकावी. कैरी कितपत आंबट आहे त्याप्रमाणात साखर टाकावी. तोतापुरी कैरी घ्यावी. नंतर जिरेपूड, तिखट, मीठ घालावे. तिखट खूप घालू नये. 

नंतर हे मिश्रण सगळे  ढवळून घ्यावे. चव घेऊन बघावी. काही कमी जास्त वाटल्यास टाकून घ्यावे.नंतर स्टील पातेल्यावर पांढरे कापड बांधावे. असे हे पांढरे कापड लावलेले पातेले 3 दिवस उन्हात ठेवावे. त्यानंतर ते कापड काढून हे मिश्रण हलवून घ्यावे. झाला आपला गोड आंबट छुंदा तयार.  सूर्य किरणांनी ते साखर, मीठ, कैरी असे मस्त मुरतात.असा हा  छुंदा वर्षभर टिकतो. गुजराती बांधव  हा छुंदा नेहेमी करतात. काय मग करून बघा.

टीप: स्टीलचेच पातेले वापरावे. अल्युमिनियम वापरू नये.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२