सर्वात वर

खमंग ट्रँगल

शीतल पराग जोशी 

Khamang Triangle Recipes
गोड शंकरपाळे करतो त्याऐवजी असे तिखट ट्रँगल (Khamang Triangle) नक्की करून बघा. मुलांना डब्यात द्यायला चांगले असतात. कमी साहित्य लागते.

साहित्य: २ वाटी तांदूळ पीठ, 2 टीस्पून जिरे, 2 टिस्पून तीळ, 1 टिस्पून तिखट, 1 टीस्पून चाट मसाला, मीठ, तेल, लोणी

कृती: एक कढई घेऊन त्यात 2 वाटी पाणी उकळण्यास ठेवावे. ते गरम झाले की त्यात 2 चमचे लोणी अथवा तेल घालावे. नंतर तीळ आणि मीठ घालावे. आणि मग तांदूळ पीठ घालावे. चांगले एकत्र करून 10 मिनिट वाफ येऊ द्यावी. आणि गॅस बंद करावा.  पीठ गार झाले की मळून घ्यावे. पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटावी. नंतर त्यावर काटा चमचा घेऊन टोचे मारावेत. नंतर फिरकीने ट्रँगल करून घ्यावेत. कढईत तेल घेऊन ते तापले की त्यात हे ट्रँगल (Khamang Triangle)तळून घ्यावेत. नंतर त्यावर ते गरम असतानाच तिखट,  चाट मसाला घालावा. काय मग करून बघा. आता पावसाळा येतोय. चहा बरोबर छान वाटेल ना खायला.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 


संपर्क-९४२३९७०३३२