सर्वात वर

लिट्टी चोखा

शीतल पराग जोशी

बिहार आणि झारखंड मधील ही पारंपरिक लिट्टी चोखा(littiychokha)रेसईपी आहे. खूप सुंदर लागते. जरा चेंज पण चांगला वाटतो. 

साहित्य: 2 वाटी कणिक, 2 चमचे साजूक तूप, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून सोडा, मीठ चविनुसार

सारण: 1 वाटी चणा डाळ पीठ, लोणचे मसाला, 1 कांदा, 1 चमचा आले पेस्ट, 2 चमचे सरसू तेल किंवा साधे तेल, कोथिंबीर 2 चमचे, 2 हिरवी मिरची

चोखा: 1 भरीत वांगे, 2 टोमॅटो, 1बटाटा ( हवे असल्यास),1 कांदा, 2 चमचे आले लसूण पेस्ट, तेल, 1 चमचा हिरवी मिरची, कोथिंबीर

कृती: गव्हाचे पीठ घेऊन त्यात ओवा बारीक करून घालावा. त्यात साजूक तूप, मीठ आणि सोडा पाणी घालून पीठ भिजवून  घ्यावी. कणिक घट्टच भिजवावी.

सारण: 1 वाटी चणा डाळ पीठ किंवा डाळया चे पीठ भाजून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा,आले लसूण पेस्ट,बारीक चिरलेली मिरची घालावी. कैरीच्या लोणच्याचा खार घालावा. मीठ आणि तेल टाकावे. हवे असल्यास थोडा लिंबूरस घालावा. चांगले मिक्स करून घ्यावे. सारण कोरडे असल्यास त्यात थोडे पाणी घालून सारण तयार करावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी.कणकेचा एक गोळा घेऊन त्याला कटोरीचा आकार देऊन त्यात हे सारण भरावे. आणि गोळा बंद करून घ्यावा. त्याला तेलाचा हात लावून असे 6 , 7 लिट्टी बनवून घ्यावे. सारण भरपूर भरावे. आपण बट्टी करतो त्याप्रमाणे करावे. फक्त ह्यात सारण असते.एक कढई घेऊन त्यात साजूक तूप घालावे. त्यात ह्या लिट्टी भाजून घ्याव्या. चौफेर शेकाव्या. लाल झाल्या की काढून घ्याव्या. परत थोडे तूप घालावे. गॅस मंद ठेवावा. झाल्या आपल्या लिट्टी (littiychokha) तयार.

चोखा:भरीत वांगे, टोमॅटो धुवून घ्यावे. वांग्याला चीर पाडून त्याला तेल लावून गॅसवर भाजुन घ्यावे. टोमॅटो गॅसवर भाजून घ्यावे. ताटात काढून घ्यावे. वांग्याचे, टोमॅटोचे साल काढुन घ्यावे. १ उकडलेला बटाटा घ्यावा. हे सगळे चांगले स्मॅश करावे. एक कढईत तेल घेऊन त्यात कांदा,मिरची तुकडे, आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे.हिंग घालावे. थोडे तिखट घालून हा तडका त्या स्मॅश केलेल्या मिश्रणावर घालावा. मीठ घालावे.वरून कोथिंबीर घालावी.झाला आपला चोखा तयार. वर केलेल्या लिट्टीबरोबर हा चोखा खावा.(littiychokha) लिट्टी वर मस्त तूप सोडावे.

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी

संपर्क-९४२३९७०३३२