सर्वात वर

मसाला कारली

शीतल पराग जोशी 

साहित्य: (Masala Karli) 6 छोटी कारली, 1/2 वाटी दाणेकूट,2 चमचे तीळ, 2 चमचे खोबरं किस,7 लसूण पाकळ्या, 3 चिंच बुटुक, 3 चमचे गूळ, गोडा मसाला 1 चमचा, 1 चमचा तिखट,1 चमचा कांदा लसूण मसाला, मीठ, 1 टिस्पून हळद, 1टीस्पून हिंग, तेल, 1टीस्पून मोहोरी, 1 टिस्पून जिरे

कृती: कारले स्वच्छ धुऊन घ्यावे. त्याला चाकूने 2 चीर कराव्या. कोवळ्या बिया असतील तर राहू द्याव्या. पूर्ण कारले पोखरू नये. नंतर त्यात मीठ भरावे. 12 मिनिटानंतर एक कढईत थोडे पाणी घेऊन त्यात हे कारली सोडावीत. थोडी शिजले की, कारले दाबून त्यातील पाणी एक ग्लास मध्ये काढून घ्यावे. ते पाणी खूप पौष्टिक आहे. हवे असल्यास प्यावे.

नंतर मसाला करण्यास घ्यावा. शेंगदाणे कूट, तीळ, खोबरे, लसूण, चिंच, गूळ, गोडा मसाला, तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ सगळे एकत्र करून मिक्सरला फिरवून घावे. पाणी टाकू नये. नंतर हा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यावा. मस्त आंबट गोड मसाला असतो.

कढाई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल तापले के त्यात जिरे, मोहोरी टाकावी. ते तडतडले के त्यात हिंग, हळद घालावी. मग ही मसाला भरलेली कारली घालावी. आणि उरलेला मसाला टाकून द्यावा. मस्त कारले फ्राय झाले की खाण्यासाठी तयार ही मसाला कारले. 

कडू असल्यामुळे मुले कारले खात नाहीत. पण अशी कारली केली की नक्की खातील. आणि कारले खाणे खूप महत्वाचे आहे. तुम्हाला रस्सा हवा असल्यास फ्राय करताना त्यात पाणी घालावे. काय मग करून बघा अशी सुरेख कारली (Masala Karli). 

संपर्क-९४२३९७०३३२ 

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी