सर्वात वर

व्हेज मोमोज

शीतल पराग जोशी 

Veg Momos
हा प्रकार मोदकासारखाच असतो. आपण जे उकडीचे मोदक करतो ना त्याप्रमाणे करायचे असतात. फक्त हे तिखट असतात. डाएट कॉन्शस असणाऱ्यांना खूप चांगले आहेत. कारण यात तेलाचा कमीत कमी वापर आपण करतोय.

साहित्य: 1 मोठी वाटी मैदा, मीठ, तेल

सारण: 1 कांदा,2 हिरव्या मिरच्या, 8 पाकळ्या लसूण, 1 सिमला मिरची, 1 गाजर, 7 सोयाबीन वडी, 1 वाटी पानकोबी, तेल, मीठ, मिरे पावडर

कृती: मैदा घेऊन त्यात थोडे तेल आणि मीठ घालून मैदा व्यवस्थित भिजवून घ्यावा. तो 20 मिनिट झाकून ठेवावा.नंतर एक पॅन घेऊन थोडेसे तेल त्यात घालावे. सगळ्या भाज्या किसलेल्या किंवा बारीक चिरलेला हव्यात. त्यात बारीक चिरलेला लसूण,हिरवी मिरची घालावी. त्यात कांदा,सिमला मिरची घालावी. सोयाबीन वडी गरम पाण्यातून काढून ते पण क्रश करून घ्यावे. हे ऑपशनल आहे. तुम्हाला हवे असल्यास टाकू शकतात. सोया क्रश घालावा. किसलेलं गाजर, कोबी घालावी. हे छान परतवले की त्यात थोडी मिरे पावडर घालावी. मीठ घालावे. आणि गॅस बंद करावा. सारण फक्त कोरडे असले पाहिजे.

नंतर एक पातेले घेऊन त्यात पाणी उकळण्यास ठेवावे. किंवा स्टीमर असेल तर बेस्ट. मैद्याचा एक छोटा गोळा घेऊन तो पुरीएवढा लाटावा. फक्त पुरी खूप बारीक लाटावी. नंतर त्यात आपण बनवलेले सारण भरावे. आणि त्याला मोदकाचा आकार द्यावा. 6/ 7 मोमोज झाले की चाळणीला तेल लावून त्यावर हे मोमोज वाफवायला ठेवावे. 10 मिनिट मोमोज वाफवावे. आणी गरमागरम मोमोज (Veg Momos) सर्व्ह करावे.  

मोमोज चटणी 

साहित्य: १ कांदा, 1 टोमॅटो, 1 इंच आले, 5 लसूण पाकळ्या, 2 लाल मिरच्या, मीठ, जिरे, 1 टीस्पून साखर

कृती:  1 पॅन घेऊन त्यात जिरे ,कांदा, लसूण, आले, टोमॅटो, परतवून घ्यावे. 5 मिनिटे परतावे. ते थंड झाले की त्यात थोडे मीठ आणि साखर घालून मिक्सरला ही चटणी वाटून घ्यावी. अशी ही लालेलाल चटणी मोमोज बरोबर अप्रतिम लागते. करा मग लवकर. मोमोज आणि चटणी.

शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२