सर्वात वर

Reliance Jio : मुकेश अंबानीं यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : Reliance Jio चे सर्वेसवा मुकेश अंबानी यांनी भारतातील इंटरनेट युजर्ससाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे. भारतात २०२१ च्या उत्तरार्धात रिलायन्स जियो (Reliance Jio) कडून ५ G सेवा उपलब्ध होऊ शकते असे सांगण्यात आले आहे.रिलायन्स जिओ देशात ५ जी ची क्रांती घेऊन येणार असून या सेवेसाठीचे संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. या व्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल.Jio द्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत असंही अंबानी म्हणाले.

सरकारला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायची आवश्यकता आहे.भारतातील ५ जी सेवांच्या बदलांमध्ये जिओ अग्रक्रमाने पुढाकार घेईल.जोपर्यंत धोरणात्मक निर्णयारित्या यात सुलभता आणली जात नाही आणि ही सेवा स्वस्त दिली जाणार नाही तो पर्यंत याचा लाभ सामन्यां पर्यंत पोहचवणे शक्यता नसल्याचंही अंबानी म्हणाले.

भारतात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २G सेवा वापरणारे ग्राहक आहेत.या लोकांपर्यंत Smartphones पोहोचणं आवश्यक आहे.त्यासाठी काही धोरणात्मक बदल ही अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत.असं असलं तरीही आज ३० कोटी ग्राहक २ G फोनचाच वापर करत आहेत,असंही मुकेश अंबानी यांनी स्पष्ट केलं.