सर्वात वर

नाशिक शहरासह जिल्ह्यातील निर्बंध शिथिल : काय सुरु राहणार काय बंद जाणून घ्या

जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत काय सुरू आणि काय बंद यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

नाशिक- गेल्या काही दिवसा पासून नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होते आहे.त्यामुळे नाशिक मधील निर्बंध काही प्रमाणात कमी होणार आहेत.(Restrictions Relaxed in Nashik City and Districts) नाशिक शहरासह जिल्ह्यात १ ते १५ जूनपर्यंत नक्की काय सुरू असेल आणि काय बंद असेल यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज घोषणा केली आहे.नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्या पेक्षा कमी आल्याने काही प्रमाणात हे निर्बंध उठवले असून  दर शुक्रवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर निर्बंधांचा निर्णय घेतला जाणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेट कुल्याही परिस्थितीत १० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असून जर हा रेट १० टक्क्याच्या वर गेला तर पूर्वी प्रमाणे निर्बध लागू केले जातील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. 

सुरु केलेल्या आस्थापनेत त्रिसूत्री चे पालन होणे गरजेचे आहे. ज्या आस्थापनेत हे निर्बंध न पाळल्याचे निदर्शनास आल्यास त्या दुकानदारांना ५ हजार रुपयांचा दंड करण्यात येईल  पुन्हा जर निर्बंधाचे उल्लन्घन करतांना निदर्शनास आल्यास ते दुकान  पुढील काही महिन्यासाठी बंद करण्यात येईल. तसेच नागरिकांनी नियम मोडल्यास १ हजाराचा दंड करण्यात येणार आहे. रुग्ण संख्या अजून कमी झाल्यास अजून सवलत देण्यात येईल असे हि पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

नाशिक शहारा सह जिल्ह्यात काय सुरु काय बंद राहणार ते पुढील प्रमाणे 

 • सर्व दुकाने सकाळी ७ ते २ या वेळात सुरु राहतील. परंतु मॉल मात्र बंदच राहणार 
 • भाजीपाला विक्री ची वेळ स.७ ते २ राहणार.
 • केशकर्तनालय, मेन्स पार्लर उघडण्यास परवानगी देण्यात आली असून  सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच हि दुकाने सुरु राहणार आहेत.परंतु दुकानदारांना फेस शिल्ड आणि मास्क वापरणे बंधनकारक असणार आहे. या दुकानात फक्त दाढी आणि कटिंग साठी सुरक्षित काळजी घेऊन परवानगी देण्यात आली आहे. मात्र स्पा बंदच राहणार 
 • येत्या १५ जूनपर्यंत वीकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवारी आणि रविवारी बंद असेल. या दोन दिवशी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.वैद्यकीय आस्थापना , दूध विक्री व कृषी साहित्य विक्री सुरू राहतील 
 • दारु विक्रीला केवळ होम डिलेव्हरीसाठी परवानगी असेल
 • अन्न पदार्थ पार्सल सुविधेसाठी सकाळी ७ ते १ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत परवानगी असेल , हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने यांना केवळ होम डिलेव्हरीला परवानगी असेल तसेच शिवभोजन थाळी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत पार्सल ने मिळणार आहे
 • रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत नाशिक शहरासह जिल्ह्यात नाई कर्फ्यू असणार आहे तसेच दुपारी ३ नंतर अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त कोणालाही बाहेर पडता येणार नाही. दुपारी ३ नंतर पोलिस कारवाई करतील याची नागरिकांनी नोद घ्यावी .अत्यावश्यक कामासाठी  बाहेर पडायचे असल्यास संबंधित कागदपत्रे जवळ बाळगावे लागणार आहेत. 
 • बांधकाम क्षेत्राची ठिकाणे , शैक्षणिक वह्या पुस्तके , स्टेशनरी दुकाने , हार्डवेअर , गॅरेजेस , घर दुरुस्ती व इलेक्टरीकल साहित्य दुकाने सुरू राहतील 
 • जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई पास बंधनकारक असेल

१५ जून पर्यंत लग्नसोहळ्यांना परवानगी नाही केवळ कोर्ट मॅरेजला परवानगी त्या ठिकाणी हि केवळ पाच व्यक्तींना परवानगी देण्यात येणार आहे. मंगल कार्यालयात लग्न आणि अनुषंगिक कार्यक्रमांना बंदी

 • बँका व पोस्ट ऑफिसचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेतच असेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु असेल मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू राहतील तसेच सरकारी कार्यालया २५ टक्के उपस्थितीने सुरु राहतील. 
 • क्रिडांगणे ,जलतरण तलाव,जिम,नाट्यगृह ,चित्रपट गृह ,उद्याने १००% बंद असतील 
 • दूध विक्री सवलत जैसे थे राहील 
 • खासगी क्लासेस फक्त ऑनलाईन सुरू राहणार 
 • अंत्यविधी साठी २० व्यक्ती परवानगी असणार असून  त्यानंतरच्या विधींसाठी केवळ १५ लोकांना परवानगी देण्यात आली आहे. 
 • रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंत  नागरीकांना बाहेर पडण्यास परवानगी नसणार आहे
 • रेशन दुकान स .७ ते १२ सुरू राहणार
 • औद्योगिक आस्थापना परिशिष्ठ अ मधील अटी शर्तीच्या अधीन राहून सुरू राहणार
 • आदेशाची प्रत