सर्वात वर

कर्नाटक विधानपरिषदेत गदारोळ : उपसभापतींना खुर्चीवरून खाली खेचले

कर्नाटक विधानपरिषदेत जोरदार गदारोळ झाला आहे. आज विधानपरिषदेत गोहत्या बंदीचे विधेयक मांडण्यात येणार होते ते मांडण्याच्या आताच विरोधकांनी उपसभापतींना जबरदस्तीने त्यांच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचा लाजिरवाणा प्रकार आज बघायला मिळाला. 

आज कर्नाटक विधानपरिषदेत सभागृहाचे कामकाज सुरु होताच उपमुख्यमंत्री अश्वथानारायण आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली त्यानंतर काँग्रेस आमदारांनी जोरदार गदारोळ करण्यास सुरुवात केली.उपसभापतींनी खुर्चीवर बसणे असवैधानिकआहे असे या आमदारांचे म्हणणे होते.गोंधळ सुरु होताच सभागृहातील मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान करायचे होते. काँग्रेसला विधेयका विरोधात मतदान करायचे होते. मंजुरीआधी जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते.असे सत्तारूढ पक्षाचा आरोप आहे. 

काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी मात्र या प्रकरणावरून भाजपावर टीका केली.भाजपा आणि जेडीएसने सभापतींना बेकायद पद्धतीने खुर्चीवर बसवले. भाजपा अशा असंवैधानिक पद्धतीने वागणे  हे दुर्देवी आहे.आम्ही त्यांना खुर्चीवरुन उतरायला सांगितले होते. पण ते बेकायद तिथे बसले असल्याने आम्ही त्यांना तिथून हटवावे लागले असे काँग्रेसचे आमदार  प्रकाश राठोड म्हणाले.