सर्वात वर

भारतीयांना मिळणार तिसरी लस :रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ ला भारतात मंजुरी

‘स्पुटनिक व्ही’ची ट्रायल हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅब्ससोबत सुरू

नवी दिल्ली – देशात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच वाढत्या रुग्ण संख्येमुळे अनेक राज्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने भारतात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आलीय.त्यामुळे, आता भारतात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लसींसोबत तिसऱ्याही लसीचा वापर लवकरच सुरु होऊ शकतो. सोमवारी, लस संबंधातील तज्ज्ञ समितीनं रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या लसीला मंजुरी दिली आहे. 

काही दिवसापूर्वी ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) ला भारतात एमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मागण्यात आली होती. तज्ज्ञांच्या कमिटीद्वारे सोमवारी या लसीच्या मंजुरीवर चर्चा करुण . आता भारतात करोनाविरुद्ध लढण्यासाठी तीन लसींची मदत होणार आहे.

रशियाच्या  ‘स्पुटनिक व्ही’ची (Sputnik V) ट्रायल हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅब्ससोबत करण्यात आली तसंच त्यांच्यासोबतच या लसीचं उत्पादनही सुरू आहे. अशातच या लसीच्या वापराला मंजुरी मिळाल्यानंतर भारतात लसीच्या तुटवड्यासंबंधी तक्रारी कमी होण्याची शक्यता आहे.    
सध्या भारतात पुण्याच्या  सीरम इन्स्टिट्युटच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा वापर केला जातोय.हाती आलेल्या वृत्तानुसार ऑगस्ट महिन्या पर्यंत भारतात सहा लसींच्या वापराला परवानगी दिली जाऊ शकते. देशात सुरू करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला यामुळे मोठा हातभार लागू शकतो.