सर्वात वर

गंगापूर धरणानजिक हुक्का पार्टीवर पोलीस अधीक्षकांचा छापा

३० ते ४० तरुण तरुणी ताब्यात 

Superintendent of Police Raids Hookah Party near Gangapur dam
Superintendent of Police Raids Hookah Party near Gangapur dam

नाशिक (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. गेल्या १ मार्च पासून नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णामध्ये मोठया प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे, त्यामुळे गर्दी करू नये आणि गर्दीची ठिकाणे टाळावीत यासारखे आदेश जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वच आस्थापना, हॉटेल, मॉल, चित्रपटगृह यांना देण्यात आले असले तरी आज पहाटे उशिरा पर्यंत  गंगापूर धरणालगत एका हॉटेल मध्ये हुक्का पार्टी (Hookah party) सुरु होती. पहाटे दोन वाजता पोलिस सचिन पाटील यांनी पथकासह छापा टाकत कारवाई केली. यात हॉटेल चालकासह कर्मचारी आणि तीस ते चाळीस तरूण तरूणींना ताब्यात घेण्याय आले आहे. 

नाशिक जिल्ह्यामध्ये एक मार्चपासून सातत्याने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत आहे.परंतु आता या आदेशाला काही व्यावसायिकांकडून हरताळ फासला जात आहे. हॉटेल आणि मॉल हे लवकर बंद होत असल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या पार्ट्या आता होऊ शकत नाही याचाच फायदा घेऊन काही नागरीक शहरापासून थोडे दूर असलेल्या हॉटेलांवर पार्टीचे नियोजन करत असल्याची बाब पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आली.   

शहर व जिल्ह्यात कोरोना  संदर्भातले नियम सर्वसामान्य काटेकोरपणे पालन करत असताना उघडकीस आलेल्या या घटनेने शहरालगतच्या ग्रामीण भागात दररोज चालणारा तरूणाईचा धुडगूस पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.   

याबाब समजलेली अधिक माहिती अशी की, गंगापूर धरणाजवळील एका पॉश हॉटेलमध्ये हुक्का पार्टी (Hookah party) सुरू असल्याची टीप ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने कारवाई करण्याचा निर्णय झाला. पहाटे दोन वाजता पोलिस पथक संबंधित हॉटेलवर धडकले. तेव्हा तिथे निर्बंधांची पायमल्ली करत उच्चभ्रू कुटुंबातील तीस ते चाळीस तरूण तरूणी हुक्का पार्टीत मश्गूल असल्याचे निदर्शनास पडले. पोलिसांना पहाताच या तरूणाईची ‘हुक्की’ उतरली. पोलिसांनी हुक्का पिण्यासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य जप्त केले. या पार्टीत इतर काही आक्षेपार्ह बाबी सापडल्या का, याचा खुलासा होऊ शकला नाही. संबंधितांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

Police Raids Hookah Party near Gangapur dam
Police Raids Hookah Party near Gangapur dam

ही एक हाय प्रोफाईल हुक्का पार्टी (Hookah party) बंद दरवाजाआड सुरू होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सतीश रामनाथ जगताप यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस उपअधीक्षक ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, कर्मचारी नितीन मंडलिक, पटेल, किरण मोरे, संदीप नागपुरे, दर्शन कोहली, पूनम घुले यांच्या पथकाने केली.