सर्वात वर

सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल : काही दिवसापूर्वी झाली होती कोरोनाची लागण

मुंबई – भारताचा माजी क्रिकेटपटू विक्रमवीर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी सचिनला कोरोनाची सौम्य लागण झाली होती तेव्हापासून तो डॉक्टरांच्या सल्ल्याने होम  क्वारंटाइन होता. आज डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मी रुग्णालयात दाखल होत आहे असे ट्विट करून त्याने कळविले आहे. 

काही दिवसापूर्वी  रायपूर येथे झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळला होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज मध्ये भारताने या विजेतेपद मिळवले होते.

या  वर्ल्ड सीरीजमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी सचिनसह अन्य चौघांना करोनाची लागण झाली होती. सचिनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात दाखल झालोय. लवकरच ठीक होऊन मी परत येईन. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत यासाठी मी सर्वांचे आभारी आहे.