सर्वात वर

सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह : ट्विट करून दिली माहिती

मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. सचिनने स्वतः ट्विट करून आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो असल्याची माहिती दिली आहे. आपल्या ट्विट मध्ये त्यानी म्हंटले आहे कि “मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःची काळजी घेत असून माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या असे सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar)आवाहन केले आहे. 

सचिन तेंडुलकरच्या घरच्यांनीही चाचणी केली असून त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सचिन तेंडुलकर नुकताच रोड  सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळाला होता.मैदानात उतरून सेहवागच्या साथीने त्याने धुवांधार बॅटिंग करून  त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली होती. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला १४ धावांनी हरवून, या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.