सर्वात वर

अंबानी स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांना २५ मार्च पर्यंत NIA कस्टडी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटेलिया घरासमोर स्कॉर्पिओमध्ये आढळलेल्या स्फोटक प्रकरणी (Ambani Explosives Case) सहायक पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Waze) यांना काल रात्री एनआयए ने अटक केल्या नंतर आज एनआयए विशेष न्यायालयात समोर हजर केले असता न्यायालयाने १० दिवस एनआयए कस्टडी दिली आहे.म्हणजे सचिन वाझे २५ मार्च पर्यंत एनआयए कस्टडी असणार आहे. काल दिवसभरसचिन वाझे यांची जवळपास १३ तास चौकशी केल्या नंतर रात्री अटक केली होती.

सचिन वाझे यांना अडकवले जाते आहे – सुधर्म वाझे 

माझे बंधू सचिन वाझे (Sachin Waze) एक सक्षम अधिकारी आहेत, त्यामुळे ते  तपास यंत्रणांना पुर्णपणे सहकार्य करतील असाही विश्वास सचिन वाझे (Sachin Waze) यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना  बोलून दाखवले या संपुर्ण प्रकरणात सचिन वाझेंना अडकवले जात असल्याची भावनाही सुधर्म वाझे यांनी बोलून दाखवली. 

सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा राम कदम यांची मागणी

महाराष्ट्र सरकारने सचिन वाझेची नार्को टेस्ट केली तर केसच्या मागे लपलेले चेहरे समोर येतील,असे राम कदम यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटरवर एक पत्र पोस्ट करून राम कदम यांनी सचिन वाझेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील मनसुख हिरेन मृत्यू आणि स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा मुद्दा उचलून धरला होता. आता सचिन वाझेंच्या अटकेनंतरही भाजप सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी भाजप नेते किरीट सौमय्या यांनी केली आहे.