सर्वात वर

साहित्य संमेलन नियोजित तारखांनाच होणार कौतिकराव ठाले – पाटील यांचे स्पष्टीकरण

नाशिक – नाशिक मध्ये कोरोना वाढतो आहे. त्यामुळे साहित्य संमेलन (Sahitya Sammelan)पुढे ढकलणार अश्या वावड्या कोणी जाणीवपूर्वक उठवतजरी असल्या तरी संमेलन नियोजित तारखांनाच होणार असे स्पष्टीकरण अखिलभारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांनी दिले आहे. 

संमेलनासाठी अजून  २५ दिवस बाकी आहे. विदर्भाच्या तुलनेत नाशिकची कोरोनाची परिस्थिती खूपच चांगली आहे. नाशिकचा रिकव्हरी रेट पण चांगला आहे. शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहे.संमेलन पुढे ढकलणार अशी चर्चा करणारा एक वेगळा गट असावा. ना. छगन भुजबळ या संमेलनाचे स्वागताध्यक्ष नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते ही संलनाबाबत बारीक लक्ष ठेऊन आहेत. सर्व बाबींची काळजी घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती मागील सप्टेंबर सारखी निश्चित नाही संमेलनस्थळी कोरोनाचे नियम पाळता येतील या साठी एक वेगळी टीम कार्यरत आहे. त्यामुळे साहित्य संमेलन (Sahitya Sammelan) नियोजित तारखांनाच होणारच असे ठाले -पाटील यांनी स्पष्ट केले. 

नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भव्य प्रांगणात २६ ते २८ मार्च पासून ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संलनाचे आयोजन करण्यात आले आहे.