सर्वात वर

Saurav Ganguli रुग्णालयात दाखल

जिममध्ये चक्कर आल्याने बीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) रुग्णालयात दाखल 

कोलकाता – भारतीय संघाचा माजी कर्णधार व बी सी सी आय चे अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguli) यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी जिम मध्ये असताना त्यांना अस्वथ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कोलकाता येथील वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांच्या नजीकच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. 

सौरव गांगुली यांना  ‘कार्डियक अरेस्ट’ सौम्य झटका बसला असून काही चाचण्या केल्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याचे समजते आहे. पीटीआय वृत्तसंस्थने रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार,सौरव गांगुली यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना  किती वेदना होत आहेत हे आम्ही तपासत आहोत. यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील असे हि म्हंटले आहे. 

सौरव गांगुली  यांना सौम्य असा हृदयविकाराचा झटका आल्या नंतर,तो योग्यवेळी रुग्णालयात आला.आता त्याची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे, असं वूडलॅन्ड्स रुग्णालयाचे डॉक्टर खान यांनी सांगितलं आहे. दरम्यान केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यांनी सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुलीला फोन करून त्याच्या तब्येती विषयीची माहिती जाणून घेतली आहे.