सर्वात वर

सावाना तर्फे “शब्द जागर” भेटूयात घरोघरी व्याख्यानमालेचे आयोजन

नाशिक-सार्वजनिक वाचनालय (Savana) म्हणजे वाचन संस्कृती वाढविण्याबरोबरच  दर्जेदार बौद्धिक खाद्य देणारी संस्था. म्हणूनच या संस्थेने कोरोना काळात श्रोत्यांची वैचारिक भूक भागवण्यासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे ” शब्द जागर ” सोहळ्यात ” भेटूयात घरोघरी ” या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.२७ मे ते १ जून सायंकाळी ६ वाजता या व्याख्यानांचा लाभ श्रोत्यांना आपापल्या घरीच ऑनलाईन घेता येणार आहे.तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी या वैविध्यपूर्ण व्याख्यानांचा लाभ घ्यावा अशी विनंती सार्वजनिक वाचनालय (Savana) कार्यकारी मंडळाच्या वतिने करण्यात येत आहे.

व्याख्यानमालेचा सविस्तर कार्यक्रम पुढील प्रमाणे …

27 मे- विषय- सावरकर विचार दर्शन. वक्ते –सावरकरांना संपूर्ण आयुष्य अर्पण केलेले अभिनेते शरद पोंक्षे .

28 मे –विषय- शतपैलू सावरकर .वक्ते- सावरकर अभ्यासक डॉक्टर गिरीश पिंपळे.

29 मे –अशोक देवदत्त उर्फ आप्पा टिळक- एक वेगळे व्यक्तिमत्व. वक्ते -अभ्यासू प्रकाशक रामदास भटकळ.

30 मे- कोरोनाच्या चक्रव्यूहाचा भेद.  वक्ते -पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर धनंजय केळकर.

31मे- आपत्तीतील ऊर्जा.वक्ते- अभ्यासू अभिनेते दीपक करंजीकर.

1 जून -लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे. वक्ते- ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक एकनाथ पगार .

 ऑनलाईन लिंक 

_Click here to Join Zoom Meeting_https://us02web.zoom.us/j/83223519204?pwd=V3diTGlGVVp4bm4zTDE2TDM4Vk5Edz09
Meeting ID: 832 2351 9204

Passcode: 1234