सर्वात वर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन

बातमीच्या वर

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुजरातचे राज्यसभा खासदार अहमद पटेल यांचे आज (२५ नोव्हेंबर २०२०) पहाटे ३.३० वाजता कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते.त्यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करून हि माहिती दिली. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. तेथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. 
अहमद पटेल यांनी मागील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती.७१ वर्षांचे अहमद पटेल ३ वेळी लोकसभा सदस्य राहिले होते. तर ५ वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये काँग्रेसचे पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 

अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने आपला चाणक्य‘ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती. 

अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले 

त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली