सर्वात वर

SENSEX ७०४ अंकांनी वधारला

बातमीच्या वर

गेले सहा दिवस भारतीय शेअर बाजार सतत सकारात्मक बंद होत आहे. याला मुख्य कारण म्हणजे अमेरीकेच्या  निवडणूका आणि विदेशी वित्तीय संस्था यांच्या कडून होणाऱ्या खरेदी त्यामुळे ही तेजी बघायला मिळत आहे, आज निफ्टी रेकॉर्ड हाय वर बंद झाला.आंतरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे आज सकाळी भारतीय शेअर बाजारात SENSEX 519 अंकांनी तर निफ्टी 148 अंकांनी सकारात्मक उघडले, ही तेजी शेवट पर्यंत कायम राहिली काही प्रमाणात VOLATILE सुद्धा बाजार दिसला परंतु बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक तब्बल ७०४ अंकांनी वधारून ४२५९७ ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक १९७ ,अंकांनी वधारून निफ्टी रेकॉर्ड हाय म्हणजे १२४६१ ह्या पातळीवर बंद झाला. 

आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर १४७९ समभाग सकारात्मक होते तर ११५५ समभाग नकारात्मक दिसले आणि १८१शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही. बँकिंग आणि एनेरजि क्षेत्र आज २% ,वधारले तर स्मॉल आणि मिड कॅप १% आणि ०.५०%  ने वाढले अमेरिकेतील निवणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत तसेच  उद्या बिहारच्या निवणुकांचे निकाल लागणार आहेत.बाजारात ऑटो आणि ट्रक यांच्या विक्तीचे आकडे समाधान कारक येतांना दिसत आहेत.बाजारातील जाणकार वरच्या स्तरावर काही प्रमाणात नफा वसुली अपेक्षित करत आहेत पण ते कधी हे आता वेळच ठरवेल.

NIFTY १२२४६१ + १९७

SENSEX  ४२५९७ + ७०४

BANK NIFTY  २७५३४ + ७३५

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

DEVIS LAB ३४१३ + ५% 

BHARTI ARTL ४७३ + ५% 

INDUSIN BANK ७७५ + ५%

ICICI BANK ४६४ + ५%

AXIS BANK ५६८ + ५%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

CIPLA ७६७ – ३%

ADANI PORT ३६७ – १%

MARUTI।        ६८६३ – १%

I T C १७३ – १%

DR. REDDY      ४८८९ – ०.२९%

यु एस डी  आई एन आर $ ७४.२५००

सोने १० ग्रॅम         ५११००.००

चांदी १ किलो       ६३७००.००

क्रूड ऑईल            २९८०.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile -8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली