सर्वात वर

सेंसेक्स – निफ्टीचा उच्चांक

विश्वनाथ बोदडे, नाशिक

कालच्या भारतीय शेअर बाजारातील उताराच्या परिस्थितीवर आज आंतरराष्ट्रीय संकेत आजच्या आधारे सकाळी बाजार सकारात्मक उघडला सेन्सेक्स 209 अंकांनी व निफ्टी 62 गाडी उघडले होते काही काळ बाजारात चढ-उतार दिसला परंतु आज कालच्या सारखी परिस्थिती नव्हती कारण बाजारामध्ये सिलेक्टिव्ह सेक्टरमध्ये चांगल्याप्रकारे खरेदी दिसत होती त्याचबरोबर मागील लेख उल्लेख केल्या प्रमाणे आज बाजारात चांगल्या प्रतीच्या आणि नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारे खरेदीचा चोर दिसला त्याच बरोबर काल मदारी ग्रुप ऑफ कंपनी मध्ये जो सेल ऑफ आला होता त्याला मात्र ब्रेक बघायला मिळाला या सर्वांचाच परिणाम बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 221 अंकांनी वधारून आतापर्यंतच्या सर्वात उंच स्तरावर म्हणजेच 52 773 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 57 वधारून 15 869 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला निफ्टी बँक हा निर्देशांक 297 अंकांनी वधारून 35 248 या पातळीवर बंद झाला.

बाजाराला आज सकारात्मक दिशा देण्यामध्ये जागतिक स्तरावरील शेअर बाजारांमध्ये दिसलेली तेजी हा मुख्य आधार होता परंतु स्थानिक स्तरावर सुद्धा बाजारामध्ये चांगल्या प्रतीच्या सर्व भागात मध्ये खरेदी बघायला मिळत होती, कारण आज विदेशी वित्तीय संस्था यांच्यामार्फत जवळपास सात हजार करोड ची खरेदी दिसली तर स्थानिक वित्तीय संस्था यांच्या मार्फत 3000 करोड च्या वर खरेदी बघायला मिळाली त्यामुळे सेन्सेक्स आणि सकारात्मक राहिले.

डॉलरच्या बदल्यात रुपया जरी स्थिर असला तरी सोने आणि चांदी या धातूवर ने मात्र निराशा केली कारण आजपासून सराफा बाजारासाठी आणि सोने खरेदी विक्री करण्यासाठी काही नियमावली घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे सोने आणि चांदी या मध्ये विक्री दिसली परंतु मागील काही दिवसापासून क्रुड ऑईल मध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

आम्ही गुंतवणूकदारांना जनस्थान च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सल्ला देत असतो की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक ही जरी जोखमीची असली तरी आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या भारतात सल्ला घेऊन बाय ऑन डीप तंत्राचा वापर करून खरेदी करावी आणि वरच्या स्तरावर नफा वसुली सुद्धा करत रहावे, कारण बाजार नेहमी गुंतवणुकीसाठी संधी देत असतो फक्त आपण प्रॉपर इंट्री आणि एक्झिट करणे आवश्यक आहे.

NIFTY १५८६९ + ५७

SENSEX ५२७७३ + २२१

BANK NIFTY ३५२४८ +२९७   

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

ASIANPAINT ३०३५ + ३%

HDFC LIFE ६९४ + २%

AXIS BANK ७४९ + २%

ICICI BANK ६४४ + २%

HINDUNILVR २३९४ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

DIVS LAB ४३१९ – २%

ADANIPORTS ७५७ – २%

COAL INDIA १५७ – २%

TATA MOTORS ३५२ – १%

BAJAFINSV ११८०० – १%

यु एस डी आय एन आर $ ७३.४४५०

सोने १० ग्रॅम         ४८४३०.००

चांदी १ किलो        ७१५००.००

क्रूड ऑईल            ५२६५.००

विश्वनाथ बोदडे, नाशिक

संपर्क – 8888280555