
SENSEX ५५३ अंकांनी वधारला

जागतिक आणि भारतीय शेअर बाजारात मात्र दिवाळी आधीच दिवाळी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील पाच दिवसांपासून शेअर बाजार ह्या ना त्या कारणाने तेजी नोंदवत आहे, आज सुद्धा ग्लोबल संकेत सकारात्मक परंतु सिंगापूर निफ्टी हलक्या स्वरूपात नकारात्मक असतांना सुद्धा भारतीय शेअर बाजार SENSEX 62 अंकांनी तर निफ्टी १७ अंकांनी सकारात्मक उघडले.
काही काळ बाजारात चढ उतार बघायला मिळलेत परंतु बाजारात RELIANCE आणि बँकिंग क्षेत्रातील शेअरमध्ये आलेल्या मागणी मुळे बाजारात तेजीचे वातावरण परत निर्माण झाले त्यामुळे आज बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल ५५३ अंकांनी वधारून ४१८९३ ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा १४३ अंकांनी वधारून १२२६१ ह्या पातळीवर बंद झाला तर निफ्टी BANK ४८६ अंकांनी वधारून २६७९९ ह्या पातळीवर स्थिरावला.
आजच्या बाजारात सुद्धा ग्लोबल इफेक्ट्स बघायला मिळला परंतु RELIANCE व BANKING आणि FINANCE क्षेत्रातील शेअर्सच्या मागणीमुळे बाजारात चांगलीच तेजी नोंदवली गेली .
आजच्या बाजराच्या लांबीचा विचार केला तर १४७८ समभाग सकारात्मक दिसले तर ११०६ समभाग नकारात्मक आणि १८६ शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही.
क्षेत्रानुसार विचार केला तर बँकिंग, आय टी, मेटल, एनेरजि ह्या क्षेत्रात खरेदी दिसली तर एफ एम सी जी आणि फार्मा क्षेत्रात विक्रीचा जोर बघायला मिळला.
NIFTY १२२६१ + १४३
SENSEX ४१८९३ + ५५३
BANK NIFTY २६७९९ + ४८६
आज निफ्टी मधील वधारलेला शेअर्स
RELIANCE २०२५ + ४%
BAJAFINSV ६२६७ + ४%
INDUSIN BANK ७३८ + ३%
HDFC BANK १३०८ + ३%
KOTAK BANK १७१४ + २%
आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
MARUTI ६८९० – ३%
GAIL ८६ – २%
BHARTI ARTL ४५० – २%
ASIAN PANT. २२०५ – २%
GRASIM ७९३.४० – २%
यु एस डी आय एन आर $ ७४.२७००
सोने १० ग्रॅम ५२४२०.००
चांदी १ किलो ६५८५०.००
क्रूड ऑईल २८८२.००

विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile-8888280555
