सर्वात वर

कोरोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिटय़ूटला भीषण आग

पुणे (प्रतिनिधी) – कोरोनावर प्रभावी लस बनवणाऱ्या पुण्यातील मांजरी येथील सिरम कंपनी (Serum Institute) मध्ये आज दुपारी भीषण आग लागली आहे.या आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू असून असून अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) कोरोनावरील कोविशिल्ड लस बनवल्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे देशभरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.सीरम कंपनीच्या बीसीजी प्लांटच्या तिसऱ्या मजल्यावर हि आग लागली असून या इमारतीमध्ये केवळ इन्स्टॉलेशन सुरु आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड किंवा बीसीजीच्या प्लांटला कोणताही धोका नाही, असे सीरम कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.अद्याप तरी जीवितहानीचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही आग नक्की शॉर्टसर्किटमुळे लागली आहे की अन्य काही कारणे आहेत याचाही शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.