सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

(Shani Shastra)

नवमात शनी म्हणजे भाग्यस्थानी शनी असता नोकरी,उद्योगधंदा या स्थानी वृषभ व वृश्चिक राशीचा शनी व हर्षल असल्यास  कमिशनर,विदेशात वकील, गुप्त पोलीस खाते या ठिकाणी ह्या व्यक्ती लायक असतात. दशमेश शनी असला, तर नोकरीत काही आक्षेप येण्याची शक्यता, संकटे येतात. बडतर्फ होण्याचा प्रसंग येईल पण होणार नाही. उत्तरषाढा नक्षत्रात शनी असता घरात, वकिली,डॉक्टरी हा पिढीजात व्यवसाय असतो.11,10,  7,6,2,राशीत शनी असता शिक्षक, संशोधक,कोर्टात अगर वकिलांचे कारकून,स्वतंत्र व्यापारी असे असतात. 

नवम स्थानात कोणत्याही राशीचा शनी असता उद्योगधंद्यात फेरफार होणे, धंद्यात नुकसान असे प्रकार घडतात म्हणून आपण नेहमी सावध असावं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण नेहमी नितीतत्वाने व्यवहार करावा..सचोटीने वागणाऱ्याला शनी महाराज नेहमीच सहकार्य करतात.12,8,4, राशीत शनी असून तो शुभ असेल, तर अध्यापन कार्य करणे,ग्रंथप्रकाशन, वेदांत,कायदा,तत्वज्ञान,सार्वजनिक हित साधने,शास्त्र या विषयांचा व्यासंग ठेवणे,वकिली,गुप्त गुन्हे शोधणे ईत्यादी योग येतात. या ठिकाणी शनी स्वराशीचा उच्च असता जातक भाग्यशाली होतो. 

या ठिकाणी शनी हा रवि, शुक्र, हर्षल,मंगळ यांचे शुभदृष्ट असेल, तर असे लोक मेकॅनिकल इंजिनियर, पोलाद, लोखंडाचे कारखाने काढणारे असतात.11,10,7 6,3,2 राशीत शनी असता येथील शनी कोणत्याही ग्रहाचे अशुभ दृष्टीत असता परक्या देशातील उद्योगधंद्यात फारसा यशस्वी होणार नाही.8,1 राशीचा शनी अपयश देतो,त्याचा विचार करूनच निर्णय घ्यावा. वृश्चिकेचा शनी अत्यन्त कारस्थानी असतो.परंतु शेवटी सर्वधंद्यात अपयश आणण्याचा प्रयत्न करतो.12,8,4 राशीचा शनी सरकारी नोकरीत असणाऱ्यांना त्रासदायक होतो.शनी असता उद्योगधंद्यात फेरफार होतात. धंद्यात थोडीफार नुकसान होते.   

या स्थानात 11,7, 6,2 राशीत शनी असता हे लोक क्वचित प्रसंगी रजिस्टर पद्धतीने विवाह करून काहीतरी वैचित्र्य दाखवतील. स्थिर झाल्याशिवाय  विवाह करण्यास तयार होणार नाहीत. परदेशात गेले , तर तिकडची एखादी स्त्री करून आणतील. या स्थानी 12,9,8,5,4,3,1 या राशीत शनी असता हा पित्याला सर्वात धाकटा असतो किंवा एकुलता असतो. या ठिकाणी शनी असता व्यक्ती महत्वाकांक्षी असतो.11,9,7,5, 3,1 या राशीत असता फार महत्वाकांक्षी असतो.तत्वज्ञान,वेदान्त याची आवड असते. धर्माबद्दल श्रद्धा असते. कोणाची पर्वा न करता आपली मते स्पष्ट मांडतात.12,8,4 राशीत शनी असता मनःप्रवृत्ती हलकी असते. त्यांना अब्रूची जाणीव नसते.हे लोक व्यसनी असतात पण व्यसन-  (क्रमशः)  भाग-११५ (Shani Shastra)

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक

संपर्क-9096587586