सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

(Shani Shastra) 12,8,4 राशीत शनी असता मनःप्रवृत्ती हलकी असते. या व्यक्तीना अब्रूची भीती नसते.हि व्यक्ती अतिशय व्यसनी असले, तरी स्वखर्चाने व्यसन चालू ठेवतात. या ठिकाणचा शनी वाचनाची आवड देतो.चौकस असून हट्टी व हेकेेखोर असतो. कुटुंबप्रेम चांगले असते. स्वतःबरोबर कुटुंबातील माणसाची उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न करतात.मूळ नक्षत्रात शनी असता आयुष्यात बऱ्याच वेळा प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याकडे कल असतो. बऱ्याच वेळा ह्या व्यक्ती चांगली संधी गमावतात.

उत्तरषाढा नक्षत्रात शनी असता व्यक्ती आळशी असतात. येथे शनी असता भ्रमनशील,वाचाळ,भीरु, प्रवासी,साहसी, धर्मात्मा व शत्रूंनाशक होतो. या ठिकाणी शनी पीडित असेल, तर स्वभाव मत्सरी,स्वार्थी,कंजूष वर्मी  बोलणे, धर्मवेड दुसऱ्यावर आरोप करणे, खोटा अभिमान असा स्वभाव असतो. या ठिकाणी शनी मंगळाचे अशुभ दृष्टियोगात असता मानसिक  क्लेश होतात. मनोवृत्ती थोडी विकृतच असते. 5,1 राशीचा शनी असता दांभिकपणा उत्पन्न करतो.आचार-विचार शुद्ध नसतात. वृषभेचा शनी असता धर्मभ्रष्ट होतो. सिंह राशीचा असता पापी असतो. या ठिकाणी शनी असता पुराणमतवादी, आचार- विचार याने कर्मठ असतात

या ठिकाणी 12, 8,4,11,7 3,9,5, 1, या राशीत शनी असता 28व्या अथवा 37व्या  वर्षी भाग्योदय होऊन उत्तरोत्तर वाढत जातो.शनी- राहुची युती या ठिकाणी होईल, तर धार्मिक बाबतीत उत्तम असते.पुष्कळ प्रवास व तीर्थयात्रा होईल. जल प्रवास होतो. भाग्योदयाच्या कामी अनेक अडथळे येतात. 38व्या वर्षानंतर चांगली स्थिती प्राप्त होते. 11,7, 3 राशीतील शनी भाग्योदयाच्या बाबतीत उत्तम समजावा मिळवावयास 20 व्या वर्षांपासून प्रारंभ होतो. पराक्रमी व धनवान होतो. या व्यक्तीकडून राजद्रोह घडतो. लाच खाऊन दुसऱ्याला फसवून अनैतिक मार्गाने पैसा मिळतो.  – या ठिकाणचा शनी पीडित असता परदास्य  करणारा, पितृकीर्तीला कलंक लावणारा, मित्ररहित कामी व भाग्यहीन होतो.12,8,4 या राशीचा शनी असून तो शुभसबंधीत असता पुण्यात्मा , पवित्र आचरण पराक्रमशीलता, संन्याशी वृत्ती, राजसगुणप्रधानता, संपत्तीमान असा होतो. 

पूर्वजन्मी योगभ्रष्ट असलेली ही व्यक्ती वयात येताच एकदम वैभवास चढतो. सद्गुरू कृपा होते. नास्तिकाचा आस्तिक बनतो. कर्क राशीचा शनी असता मंद भाग्योदय होतो. या ठिकाणी 11,10,7,6,2 या राशीचा शनी असता शिक्षण पूर्ण होते. 11,9,7,5,3,1, या राशीचा शनी असता शिक्षण पुरे होते व 12,10,8,6, 4,2,1 राशीस शनी असता थोडे अडथळे येऊन कमी शिक्षण होते. योगशास्त्राचा अभ्यास  होतो.या ठिकाणी 10,8,2,11,7,3 राशीचा शनी असता अत्यन्त अभ्यासू, विचारी शोधक बुद्धीचे (क्रमशः) (Shani Shastra)  भाग -११६

Hari Ananta
हरिअनंत,नाशिक


संपर्क- 9096587586