सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

या स्थानावरून अनपेक्षित धनलाभ होतो. येथे 11,10, 7, राशीचा शनी (Shani Shastra)असता धनलाभाचा योग्य येणार नाही.स्त्रीधन मिळणार नाही.शनी, चंद्र, हर्षल व मंगळ युती किंवा अशुभ दृष्टियोग असता अशा लोकांना लाचलूचपतीच्या पायी अगर इतर बाबतीत तुरुंगात जाण्याचे योग्य येतात. इतर ग्रहांचे पाठबळाने ते सुटले तरी पुन्हा पैशाचा अपहार करण्यास प्रारंभ करतात. या ठिकाणी शनी वक्री, अशुभ दृष्ट ,शत्रूग्रही असता उद्योगधंद्याच्या बाबतीत पुरेसे भांडवल मिळत नाही. भागीदारीचीपण सांपत्तिक स्थिती  चांगली नसते. 

उद्योगात अडचणी. आशाभंग होतात. शनी अशुभ दृष्ट असता वारसा, नातेवाईक यांची इस्टेट मिळण्याचा संभव असता निराशा होते, विलंब होतो.या ठिकाणी असणाऱ्यांना नोकरीच्या पगाराव्यतिरिक्त इतर प्राप्ती होण्याचा संभव नसतो.या स्थानात शनी शुभ राशीत, शुभ संबंधित, बलवान असता पत्नी सुशील, सद्गुणी व व्यवहारदक्ष मिळते.पती व्यभिचारी, व्यसनी असला, तरी पत्नी त्याचे दुर्गुण झाकण्याचा प्रयत्न  करीत असते. पत्नी घराण्यातील मिळते.या स्थानी 10,8,7,5,1 या राशीचा शनी पुत्र संतती देत नाही परंतु भरपूर संपत्ती देईल,तर संतती फारशी देणार नाही. 

कर्क राशीचा शनी असेल तर संतती देईल या ठिकाणी शनी असता व्यक्ती अतिशय भित्रा, भित्रा, कोपिष्ट, धूर्त लबाड लोकांना अप्रिय, वैर दृष्टीचा, अतिशय दृष्ट संगतीत राहणारा, सज्जनांचा सहवास न आवडणारा असतो.दयाहीन, विश्वासघातकी असतो. शनी शुभ संबंधित किंवा  बलवान राशीत असता आपत्ती सहन करण्याची शक्ती असते. येथे शनी असता घरातील चमत्कारीकपणा अंगी येतो.

प्रसंगी एकदा तरी धर्मांतराचे विचार मनात येतात व तो ध्येयापासून एकदातरी ढळतो.या ठिकाणी शनी अशुभ राशीतला असेल, तर असा व्यक्ती व्यभिचारी, नातेवाईक स्त्रियांशी गुप्त संबंध ठेवणारा असतो. मात्र तुळ राशीचा शनी असल्यास या गोष्टीत तो अपवाद ठरतो. 

या ठिकाणी 6,3 राशीचा शनी असता वेश्यागमनी होतो. ह्या व्यक्ती अतिशय क्रोधी, असत्य बोलणाऱ्या असतात. अशुभ राशीत शनी असता व्यभिचारी असतो. आपसातील नातेवाईकातील बाईशी संबंध ठेवतात. यांच्यावर उपकार कर्त्यावरही या व्यक्ती एकर करतात.या ठिकाणी शनी असता देशांतरी भटकणारा, दुःखी,चौर्यकर्मी,फार उपवासानी क्षीण असतो.

शुभसंबंधीत किंवा  बलवान राशीत शनी असता धन मिळते.  नोकरीत अनुक्रमाने वरिष्ठ दर्जाची जागा मिळते. नोकरीत पैसे कमवता  येतील अशा ठिकाणी नोकरी मिळते.(Shani Shastra) गुढशास्त्राचा – (क्रमशः) भाग-११२

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586