सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

शनि (Shani Shastra)स्वगृही उच्च राशीत असता दीर्घायु होतो. 8,1 राशीचा असता अल्पायु होतो. या ठिकाणचा शनी दुःख व दैन्य देणारा आहे असा अभ्यास आहे. मृत्यू लांब मुदतीच्या आजाराने देतो. शनी,रवि, मंगळ, राहूबरोबर असेल,तर विचित्र रोग निर्माण करून मृत्यू होऊ शकतो ?. वृश्चिक राशीचा शनी वृद्धपकाळी अनेक दुर्धर व दुर्गंधीयुक्त आजाराने गंडांतरओढवू शकते .11,10,7 राशीचा शनी याला अपवाद आहे. 

शनी आणि राहू 12,8, 6,4,2 या स्थानातून भ्रमण करीत असता जन्मकुंडलीतील रवि- चंद्र बिघडले पाहिजेत आणि गुरु हा गोचरीने रविशी साडेसातीत आला असला पाहीजे अगर कोणत्याही  केंद्रातून भ्रमण करीत असला पाहिजे किंवा चंद्राशी साडेसाती करीत असला पाहिजे व धनेश आणि सप्तमेश यावरून शनीचे भ्रमण होत असेल, धनेश व सप्तमेश यांची युती कुंडलीत  कोठेही असली,तरी त्यावरून भ्रमण  होत असताना अगर या दोन स्थानाचे अधिपती निरनिराळ्या स्थानात असून एकवरून शनी एकवरून गुरू असे भ्रमण होत असले,तरी जीवनात अप्रिय घटना घडू शकतात.

इतके योग असले तरी धन, चतुर्थ,षष्ठ, सप्तम आणि अष्टम या स्थानातील राशीच्या अधिपतीची महादशा, अंतर्दशा असली पाहिजे, तर नक्की व निश्चयात्मक अप्रिय घटना घडतात.या योगासंबंधात माझ्या अनुभवानुसार  नव्हे तर माझं असं ठाम मत आहे जन्मकाळी शनी कोणत्याही केंद्रात असेल, तर  मृत्युच्यावेळी वर दर्शविलेल्या स्थानातून गोचरिचा जात असता मृत्यू येत नाही. 

या वेळेस शनी हा लग्न तृतीय, पंचम, सप्तम,नवम, दशम लाभ या स्थानातून शनी जात असतो. वर दर्शविल्याप्रमाणे शनी ज्ञानी रीतीने जीवनात अप्रिय घटना घडवितो.हिंदू तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करता,

सैनिक व व्यसनी लोकांकडून वरचेवर आघात होतात. व्रण पीडित, हत्ती वगैरे अरण्य पशुपासून पीडा पावणार असतो.अष्टमात शनी असता 26 व्या वर्षी गंडांतर योग आणतो.या ठिकाणी शनी असून त्याच्याजवळ चंद्र, हर्षल व मंगळ असेल किंवा या ग्रहांची अशुभ दृष्टी असेल, तर प्रसंगी शिक्षा भोगावी लागते.कित्येक वेळा पुत्र संतती नसेल .पुत्र पुष्कळ असतील, तर दारिद्र्य येते.सिंहेचा असता गुप्त रोगाने पीडित असतो 12,9 राशीचा असता भिक्षा मागून निर्वाह करतो.  

या स्थानी शनी असता रक्तविकार, वातविकार, कुष्ठ, मूळव्याध, भगंदर, संग्रहणी, पंडुरोग, प्रमेह, नेत्ररोग वगैरे विकार होतात. (9)” नवमात शनी म्हणजे भाग्यस्थानी शनी असता”(क्रमशः)भाग-११४ 
(लेखक हरी अनंत हे २५ वर्षपासून शनिशास्त्राचे अभ्यासक आहेत ) (Shani Shastra)

हरिअनंत,नाशिक 

संपर्क-9096587586