सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक 

या ठिकाणी शनी असून त्यावर रवि, चंद्र,मंगळ यापैकी कोणाचाही अशुभ योग् असेल, तर आरोग्याची काळजी घ्यावी. जर शनी बलहीन राशीला असेल व त्यावर लग्नेश, रवि अगर चंद्र यांची अशुभ दृष्टी असेल,तर क्षयासारखे अगर रक्त अगर शक्ती कमी होणे यासारखे रोग होतात. ९,५,१ या राशीतील शनी संधिवात, गुढगे वयाच्या ३१,३२अथवा ५८,५९व्या वर्षी उत्पन्न करतो.११,७,३  राशीचा शनी वातविकार, श्वासविकार निर्माण करतो. १२,८,४ राशीचा शनी असता पूर्ववयात अशक्त व रोगी असेल, तर विवाहानंतर प्रकृती सुधारते ५,८,२ राशीचा शनी असता हृदयरोगाचे भय असते.कंठरोग वा मूत्राशयाचे रोग होतात.१२,९,६,३ राशीत शनी (Shani )असेल, तर संधिवात, दमा वगैरे रोग होतात. 

तुळ राशीचा शनी असता पोटासंबंधी रोग होतात.या स्थानी शनी असता ऐन तारुण्यात हिवताप,थंडीचा त्रास होतो. ६ अगर४ राशीचा शनी असता अपचनाचा विकार होतो. सिहेंचा शनी असता रक्तदाब व पाठीच्या कण्याचे दुखणे  होण्याची शक्यता असते.या ठिकाणचा शनी वयाच्या ५० नंतर सांधेदुखीचा आजार उत्पन्न करतो. शनी गुरूचा अशुभ योग होईल, तर  संधिवात होण्याची दाट शक्यता असते. १२,८,७,४ राशी मध्ये रवि- गुरूच्या अशुभ दृष्टीमध्ये असेल,तर  संधिवात होण्याची दाट  शक्यता असेल, तर मधुमेह, लघवी,बद्धकोष्ठ वगैरे विकार होतील.या ठिकाणचा शनी असणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. फार दिवस टिकणारे आजार होतात.नेहमी काहीतरी तक्रार असते. तरुणपणी हिवताप होतो. कर्क राशीचा असता रोगी होतो.

शनीचा या ठिकाणी रवि-चंद्र-मंगळ-राहूची युती झाली असता अर्धांगवायूचे विकार होतात.८,१राशीचा शनी असता मनुष्य रोगी असतो.अर्थात दमा, खोकला,क्षय, संधिवात, छातीचे विकार, पायाची सूज, शनी पापग्रहाबरोबर असता रोगाची तीव्रता देतो.या स्थानात शनी असता इतर लोक,नातेवाईक, मित्र- मंडळी यांच्याशी कमी पटते. मतवैचित्र्य आणि मतभिन्नता असते.मतभिन्नता असते. मामा, मावशी यांचे संसार नीट होत नाहीत. ते निपुत्रिक असतात.

येथील शनी पापग्रहाने युक्त असता मातुल घराण्याला उतरती कळा लागते.७,२ राशीचा शनी असता स्वजातीचा द्वेष करतो. सिंहेचा असता आजोळचा द्वेष करतो.७)सप्तम स्थानी शनी असता उद्योगधंदा खाली – वर असा वरचेवर होतो. धंद्यात अगर नोकरीत वरचेवर बदल होतो.तुळेत शनी असता धंद्यात अस्थिरता राहते.हा शनी कायदेशास्त्र व इतर शास्त्र या दृष्टीने चांगली फळे देतो.चित्रा नक्षत्रात गायन- वादनाचा छंद असतो. या ठिकाणी शनी स्वगृहीचा,उच्च राशीचा असता व्यापारात फायदा होतो. ८, १ (क्रमशः) भाग – १०८

Hari Anant
हरिअनंत,नाशिक 

संपर्क – 9096587586