सर्वात वर

सुखी जीवनाचे रहस्य : शनिशास्त्र

हरिअनंत,नाशिक

या ठिकाणी शनी (Shani Shastra) स्वगृहीचा, उच्च राशीचा असता व्यापारात फायदा होतो. 1,8 राशीचा असता  देशाटन केल्याने नुकसान पोहोचते.हे स्थान नोकरीचे नाही ,पण शनी 11, 10,7,6,3 राशीचे असता उद्योगधंद्यात अत्यंत यशस्वी होतो. मोठ-मोठे कॉन्ट्रॅक्ट उद्योग चांगले होतात.भागीदारही प्रामाणिक मिळतात. मक्तेदारीची कामे यशस्वी होतात, पण शनिवार रवि-गुरु-हर्षल-नेपच्चून योग असतानाच यशस्वी होतात. शनिवार रवी-मंगळ- बुध यांचे अशुभ योग असता अत्यन्त घातक समजावे. हे तिन्ही अशुभ योग धंद्यात भयंकर हानीकारक होतात.

शनी-बुधाचा अशुभ योग, लेखी कामे, हिशोबी कामे, खोटे जमाखर्च वगैरे संबंधी आपत्ती निर्माण करतो.दाम्पत्यसुख या स्थानी 8, 9,12,4, 3,1 या राशीत शनी असेल, तर विवाह एकच होतो. पती- पत्नी अतिशय प्रेमाने वागतात. दिवसभर सारखी धुसफूस, भांडण चालू असते. व सूर्यास्तानंतर ते थांबते, पण पत्नीचं पतीवर अत्यंत प्रेम असते.पत्नी पतीस देव मानते. संकटकाळी धैर्याने तोंड देणारी असते. संकटकाळी पतीला उल्हासित ठेवणारी असते. एकांतात पतीची कानउघाडणी करते. परंतु चारचौघात पतीची तोंडभरून स्तुती करते.उद्योगधंद्यात सल्ला-मसलत चांगली देते,पण पतीच्या प्रकृतीची आपल्या प्राणापेक्षा अधिक काळजी घेते. 

मेषेत शनी असता सडपातळ,उंच लांबट चेहरा,डोळे बारीक, नाकेली,वर्ण गोरा, केस भरपूर आशा तऱ्हेची पत्नी मिळते.सिंह,धनू राशीत शनी,(Shani Shastra) असता रुबाबदार,चेहरा गोल,थोडीशी पुरुषी थाटाची,मोहक, थोडीशी ठेंगणी, वर्ण निमगोरा, मितभाषी, तोंडातल्या तोंडात हसत हावभाव करणारी अशी पत्नी मिळते. 10, 6,2या राशीत शनी असता चेहरा चौकोनी, थोडीशी ओबड-धोबड, वर्ण गोरा,पण फिक्कट, केस कमी , बोलणे कमी अशी पत्नी मिळते.

11, 7, 3 या राशीत शनी असता चेहरा गोल, पाणीदार डोळे, भांडखोर, शरीराने स्थूल, केस चमकदार पण कमी, वर्ण साधारण तांबूस पण गौर, संभाषण सफाईदार अशी पत्नी मिळते. 12, 8,4 राशीचा शनी असता. चेहरा लांबट, रुबाबदार केस, जाडे- भरडे व लांबसडक, चेहऱ्यावर गांभीर्य दिसते. अतिसुंदर, प्रेमळ अशी पत्नी मिळते.

11, 10,6,2 या राशीच्या शनी असता दोन विवाह होतात.बायका कसल्यातरी मिळतात. सुख मिळत नाही. बायका भांडखोर प्रवृत्तीच्या स्वार्थी, संसारात आसक्ती असलेल्या अशा मिळतात. सातव्या स्थानी शनी असता विवाह लवकर होणार नाही. परंतु मुलीच्या बाबतीत (क्रमशः) भाग-109

Hari Anant
हरिअनंत,नाशिक

संपर्क -9096587586