सर्वात वर

शेपूची भाजी आरोग्यास फायदेशीर – (आहार मालिका क्र – २७)

डॉ.राहुल रमेश चौधरी

बाजारात मंडईत गेल्यावर हिरवीगार शेपूची भाजी टोपल्यांबाहेर मान काढून डोकावतांना सगळ्यांनीच बघीतली असेल. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती dill,anethum sowa नावाने ओळखली जाते. 

यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात. या ३० – ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात .याचे तुऱ्यातले बी म्हणजेच बाळंतशेपा होय.या शेपूच्या भाजीचे गुणधर्म उपयोग आज आपण बघणार आहोत. 

शेपूच्या भाजीचे गुणधर्म आणि उपयोग  

१.या भाजीचा उपयोग लहान मुलांवरील उपयोगापासून बघूयात,लहान बाळ-नवजात बाळ हे आईच्या दूधावरच असते,आईचे दूध कोणत्या दोषाचे व कोणत्या गुणाचे त्यावर बाळाचे पचन अवलंबून असते,अनेक वेळा आईचे दूध हे जड,कफकारक,वातकारक असते अश्या वेळी बाळाला खूप होणे,गॅस होणे,पोट दुखणे,बाळ चिडचिड करते,रडते अश्या वेळेला,शेपूची ताजी पाने १ कप पाण्यात उकळवून पाव कप शिल्ल्क ठेवलेले पाणी बाळास थोडे थोडे दिल्यास बाळाच्या सर्व वेदना,गॅस धरणे या गोष्टी बंद होतात,याशिवाय या भाजीपासून जे तेल काढले जाते ते तेलाने देखील या सर्व तक्रारी दूर होतात.

२.बांळतीन बाईस अंगावर दूध सूटत नसल्यास शेपूच्या भाजी खाल्ल्याने भरपूर दूध सुटते.रक्तस्त्राव कमी होण्यस मदत होते.

३.अनेक वेळा रुग्णांना तोंडाला चव नसणे,तोंडात चिकटा असणे,अश्या तक्रारी असतात.अश्या वेळेला शेपूची पाने चावून खावून लाळ थुंकल्यास या तक्रारी कमी होतात,तसेच तोंडाचे दुर्गंधी देखील कमी होते.

४.अनेक वेळा रुग्ण भूक नसताना जेवण करणे,घाईघाईत जेवण करणे,जड अन्न कच्चे अन्न खाणे यामुळे पचन शक्ती अशक्त होवून आजारी पडलेले दिसून येतात याने पोट दुखणे,जड पडणे,मळमळ होणे,पोटात गॅस पकडणे अश्या समस्या निर्माण होतात अश्या वेळेला उकडलेली शेपूची भाजी खाल्ल्यास उत्तम परिणाम दिसतो.

५.भरपूर दिवसाचा ताप उतरल्यावर किंवा सहज ताप उतरल्यावर लगेच जेवण सूरू करण्यापूर्वी शेपूची भाजी उकडून खावी याने भूक वाढते,अग्नि प्रज्वलित होतो,पचनास बळ मिळते,शौचास व्यवस्थित होते.

६.तरून मुलींमध्ये रक्ताची अल्पता,नवीनच आलेली मासिक पाळी,मागे पुढे होणारी मासिक  पाळी,अतिथंडीच्या काळात अचानक बंद होणारी मासिक पाळी यामध्ये ओटीपोट खूप दुखते,त्रास सहनच होत नाही,बऱ्याच वेळा वेदना शामके पण यावर काम करत नाही,अश्या वेळी शेपूची भाजी वाफाळून सूप करून त्यात जिरे,सैन्धव ,मिरपूड घालून आहारात ठेवावे,,शिवाय कंबर ओटीपोट यावर तीळतेल लावावे.

७.गळू पिकण्याकरीता शेपूचे पोतीस बांधावे व फुटल्यावर शेपूचा रस व हळद एकत्र करून बांधावी.

८.खरचटलेल्या जखमेवर शेपूच्या रसाच्या घड्या व चटणी वाटून लावावी याने वेदना दाह कमी होतो.

९.याचे तेल संधीवातावर लावल्यास वेदना मध्ये आराम मिळतो.

निषेध.

१.गर्भिणी शेपू चा वापर टाळावा किमान पहिले ४ महिने तरी

२.ही भाजी जास्त खाल्ल्यास पित्त वाढवते त्यामुळे भरपूर न खाता जपून खावी

३.पोटात गॅस पकडणे,खडा शौचास होणे,मलबध्दता यात ही भाजी जपून खावी

४.भरपूर खा खा करणाऱ्यांनी ही भाजी टाळावी.

सावधान

१.सर्व प्रयोग वैद्य सल्ल्याने करावे.

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०