सर्वात वर

अग्ग बाई सुनबाई या मालिकेतील दृश्यावर शिंपी समाजाने घेतला आक्षेप

चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळून जाहीर माफी मागावी अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून आंदोलन प्रदेशाध्यक्षा अरुण नेवासकर यांचा इशारा

नाशिक – झी टिव्ही मराठी वर  शुभदा आयरे व शेखर धवलीकर लिखित तसेच सुनील भोसले निर्मित “अग्ग बाई सुनबाई” (Agg Bai Sunbai) या मालिकेतील गुरुवार दिनांक २०मे २०२१ रोजी रात्री ८-३० वाजता नियमित पणे प्रसारीत होत असलेल्या एपिसोड पुर्वी मालिकेतील महत्वाची व्यक्ती रेखा साकारत असलेले अभिनेते “अद्वैत दादरकर” यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिवणमशीनला लाथ मारून समस्त शिंपी समाजाचा  व आपल्या सर्व्यांचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे व देशातील कोणताही शिंपी बांधव हा अपमान सहन करणार नाही टेलरिंग व शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याच्या भावना अखिल भारतीय शिंपी समाजाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनी व्यक्त केल्या आहेत 

“अग्ग बाई सुनबाई” (Agg Bai Sunbai) चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्ही यांचा अखिल भारतीय नामदेव  क्षञिय महासंघ जाहीर निषेध करत  तसेच “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी व चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळण्यात यावा अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जाहीर आंदोलन छेडले जाईल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही “अग्ग बाई सुनबाई” चे लेखक शुभदा आयरे, शेखर धवलीकर, निर्माता सुनील भोसले,अभिनेता अद्वैत दादरकर आणि दिग्दर्शक व झी टीव्हीची राहील.असा इशारा प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर तसेच उ.महाराष्ट्र  प्रमुख दत्ता  वावधने ,नासिक जिल्हाप्रमुख प्रविण पवार यांनी दिला आहे.