सर्वात वर

शिरा पोळी

शीतल पराग जोशी 

सध्याच्या लॉक डाऊन मुळे बाहेरचे गोड पदार्थ तर आपण आत्ता आणत नाहीये.  मग करताय ना….! अशी शिरा पोळी (Shira Poli) आणि साजुक तूप अहाहा मजाच मजा. समजा तुमचा शिरा उरला असेल तर तुम्ही त्यात थोडा खवा टाका. आणि अशा पोळ्या पण करु शकतात.


साहित्य: 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी साखर, 3 वाटी पाणी आणि दूध,1 वाटी साजूक तूप, काजू बदाम पूड,  2 वाटी कणिक, 1 चमचा मैदा ( हवा असल्यास), तेल, मीठ, पाणी

कृती :एक ताट घेऊन त्यात कणिक, गरम तेल,मीठ आणि पाणी घालून मळून घ्यावे. हवे असल्यास मैदा टाकू शकतात. पण मी पूरणपोळी करताना सुद्धा मैदा वापरत नाही. तरी मऊसूत पोळी होते. एक कढई अथवा पातेले घेऊन त्यात तूप टाकावे. त्यात रवा चांगला लालसर भाजून घ्यावा. नंतर यात पाणी आणि दुधाचे मिश्रण घालावे. त्याला वाफ आली की मग साखर घालावी. असा मऊ शिरा तयार होतो. त्यात तुम्ही काजू बदाम पूड टाकू शकतात.  शिरा थंड होण्यासाठी 10 मिनिट ठेऊन दया. शिरा तुम्ही करतात त्याप्रमाणे केला तरी चालेल. कारण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. शिरा नेहेमीपेक्षा गोड हवा.

कणकेचा छोटा गोळा घेऊन थोडा लाटून त्यात हा शिरा भरा. पुरणपोळीप्रमाणे भरायचे. मग तो गोळा बंद करून हलक्या हाताने लाटा. जोरात लाटल्यास शिरा बाहेर येऊ शकतो. तवा घेऊन त्यावर हे शिरा पोळी (Shira Poli) टाका. साजूक तुपावर खमंग भाजून घ्या. 

9423970332

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी