सर्वात वर

शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पनाताई पांडे यांचे निधन

नाशिक – शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका कल्पनाताई चंद्रकांत पांडे यांचे आज मध्यरात्री कोरोनामुळे निधन झाले.काहीदिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र कोरोनाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली. 

 कल्पनाताई पांडे प्रभाग २४ चे नेतृत्व करत होत्या.नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्या ४ वेळा निवडून आल्या होत्या.त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनी एकदा या प्रभागाचे नेतृत्व केले होते.कल्पनाताई पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोनवेळा काम केले होते. शिवसेनेशी शोभेशी कामाची आक्रमक शैली असल्यानेत्या नेहमी चर्चेत असत.प्रभागातील जनतेच्या समस्या महापालिकेत मांडण्यासाठी त्या सक्रिय होत्या.त्यांनी अनेकदा महापालिकेच्या सभागृहात आक्रमक आंदोलने हि केली. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या भावजयी होत्या.नाशिकमध्ये सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आता विद्यमान नगरसेवकाचाही कोरोनाने बळी घेतला आहे. 

कल्पनाताई पांडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांना सर्वस्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.आज सकाळी १० वाजता त्यांच्यावर नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली !

नाशिक महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याचे वृत्त कळाले. नाशिक महानगरपालिकेत सलग चार वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी विविध लोकउपयोगी कामे केली. प्रभाग सभापती तसेच विविध समित्यांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी स्वीकारली. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या कल्पना पांडे यांच्या निधनाने सेवाभावी लोकप्रतिनिधी काळाच्या पडदयाआड गेला आहे. त्यांच्या अकाली निधनाने पांडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय पांडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.

भावपुर्ण श्रद्धांजली !

छगन भुजबळ

मंत्री अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य,तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा