सर्वात वर

उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला.मातोश्री येथे रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधलं दुपारी ४ वाजता उर्मिला मातोंडकर पत्रकारांशी संवाद साधणार आहे.

राज्यपालनियुक्त १२ सदस्यांमध्ये शिवसेनेच्या यादीत मातोंडकर यांचे नाव आल्याचे समजल्या नंतरच त्यांचा शिवसेना प्रवेश होणार हे निश्चित झाले होते. त्यांच्या शिवसेनेच्या प्रवेशा प्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी देखील उपस्थित होत्या.येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकेत आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे.