सर्वात वर

EQUATION ची सिल्वर ज्युबिली

बातमीच्या वर

आज होणार २५ व्या भागाचे प्रक्षेपण 

मुंबई-“प्रत्येक Relation हे एक EQUATION असतं” असं म्हणत एका छोट्याश्या संकल्पनेची सुरुवात झाली. या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेक लोकांनी अनेक कलाकृती सोशल मिडियावर सादर केल्या. पण जसजसा काळ सरला, त्यांचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं. कारण रिपीटेशन, तोच तो पणा हेही असू शकतं. पण EQUATION बद्दल तसं झालं नाही. “दुसऱ्याचं, पूर्वी कधीतरी लिहिलेलं काही सादर करण्यापेक्षा स्वतःचं, ओरिजिनल कंटेंट घेऊन सादर करावं, हाच माझा विचार होता”, असं EQUATION चा लेखक-दिग्दर्शक आशिष कुलकर्णी सुरुवातीलाच म्हणाला.

आज या कलाकृतीची सिल्वर ज्युबिली साजरी होते आहे. अर्थात् या कथामालिकेचा २५ वा भाग प्रेक्षेपित होणार आहे.अशी माहिती लेखक-दिग्दर्शक आशिष कुलकर्णी यांनी दिली आहे. 

आज बुधवार  दि. ११/११/२०२० रोजी सकाळी ११ वाजता “इक्वेशन” चा सिल्वर ज्युबिली एपिसोड पाहण्यासाठीhttps://youtu.be/8XTqVQfj5c4 या लिंकवर सकाळी ११ वाजता क्लिक करा. असे आवाहन करण्यात आले आहे. 

लेखक-दिग्दर्शक आशिष कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून, लेखणीतून निर्माण होत गेलेल्या या कथामालिकेची तारिफ करावी तेवढी कमीच आहे. प्रत्येक कथेत काहीतरी नवीन, वेगळं आणि सृजन करण्याचा विचार मनात असणाऱ्या आशिष कुलकर्णी याने आपल्या “EQUATION” या कथामालिकेची पहिली कथा ८ जून रोजी “युट्यूब” या सोशल मिडियावर आपल्या “Equation” या चॅनलद्वारे प्रक्षेपित केली होती. या मालिकेत आपण एकूण ४३ कथा सादर करणार, हे त्याने आधीच ठरवलं होतं. कारण होतं या कथांचं शिर्षक. मराठी मूळाक्षरांच्या क्रमाने या प्रत्येक कथेचे शिर्षक त्याने ठेवले आहे, जे त्या त्या कथेला अगदी अनुरुप असेच आहे. अ, आ, इ, ई… अशा टायटल्स पासून सुरुवात करत आता २५ व्या एपिसोडचं टायटल आहे – थरथर.

तशी या मालिकेची संकल्पना अगदी साधी-सोपी, परंतु “ज्यांना काहीतरी नवीन आणि चांगलं पहायचं / ऐकायचं असेल, त्यांच्यासाठी मी हे सादर करतोय” असं आशिष म्हणतो. आजकाल क्रिएटिविटिच्या नावाखाली ओरिजिनल कंटेंट हरवत असताना आशिष मात्र सर्व ओरिजिनल कथा सादर करतो आहे. “आणि या मालिकेत मी एकटा नाही. माझी वेब सिरीज ही लॉक डाऊनमधली सर्वात मोठी वेब सिरीज आहे. आजपर्यंत मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील सुमारे ६५ कलाकारांनी या कथांमध्ये भूमिका निभावल्या आहेत”, असं आशिष सांगतो. हे खरं आहे. या कथामालिकेत डॉ. मोहन आगाशे, समीर धर्माधिकारी, सुलेखा तळवलकर, आशा शेलार, जयंत गाडेकर, सुरेखा कुडची, स्वप्निल राजशेखर, प्रसन्ना केतकर, रवि महाशब्दे (हिंदी मालिका – ‘गुडिया हमारी’ फेम), डॉ. विलास उजवणे, अंजली उजवणे, चारुदत्त भागवत (‘पोश्टर बॉईज’चे लेखक), अमोल बावडेकर, रुचा इनामदार, महेश कोकाटे, गायत्री सोहम, समिधा गुरु, विजय कदम, अभिलाषा पाटिल, विक्रम गायकवाड, मिनल वेदविख्यात, अभिषेक आनंद, त्रियुग मंत्री, शिल्पा वडके, नंदिनी वैद्य, मधुरा दातार, जयंत पात्रीकर यांसोबत नाशिकचे राजेश जाधव, अमोल खापरे, सिद्धार्थ शहा, चित्रा कुलकर्णी, संजय जेजुरकर अशा तब्बल ६५ कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. यात जसे सुप्रसिद्ध कलाकार आहेत, तसेच काही नवखे कलाकारही आहेत, परंतु प्रत्येकाने आपापल्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे केल्या आहेत. २५ व्या कथेत प्रसिद्ध लेखक-अभिनेते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अभिराम भडकमकर यांची प्रमुख भूमिका आहे.

“EQUATION च्या प्रत्येक कथेचा विषय वेगळा, पार्श्वभूमी वेगळी, त्यातला इश्यू वेगळा आणि कलाकारही वेगवेगळे. प्रत्येक कथेची मांडणी, धाटणी, तिची पोत जरी वेगवेगळी असली, तरीही माझी प्रत्येक कथा तुम्हाला एक सकारात्मक संदेश देऊन जाईल. जीवनाकडे सकारात्मकतेने नक्कीच बघायला लावेल”, असं आशिष ठामपणे सांगतो. “आजपर्यंत प्रेक्षकांनी या कथांना उत्तम प्रतिसाद दिला आहे, आणि दिवसेंसिवस तो वाढतच जाणार, याची आम्हाला खात्री आहे”, असं आशिष त्याच्या संपूर्ण “Team EQUATION” तर्फे म्हणतो. जनस्थानचे वाचक सजाण आहेत. त्यांनाही या कथा नक्की आवडतील, याचीही आशिषला खात्री आहे. आणि म्हणूनच या बातमीद्वारे आपणा सर्वांना त्याने “Equation” या त्याच्या YouTube channel ला SUBSCRIBE करण्याचं आणि कथांना भरभरुन प्रतिसाद देण्याचं आवाहन केलं आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली