सर्वात वर

महाराष्ट्रात ८ ते ११ एप्रिल दरम्यान तुरळक पाऊस शक्य : हवामान तज्ज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे

 अंदाज नव्हे माहिती!  

मुंबई – महाराष्ट्रात आज पासून ११ एप्रिल पर्यन्त काही भागात तुरळक पाऊस (Rain)शक्य आहे अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे (Prof. KiranKumar Johare) यांनी ‘जनस्थान’शी बोलतांना दिली आहे. 

सध्या पावसासाठी वातावरणात आवश्यक बाष्प नाही तसेच भौगोलिक परीस्थितीनुसार जेथे जास्त बाष्पीभवन होईल तसेच ढग जमत आहेत किंवा पाणी असलेले ढग वार्‍याने वाहून ज्या भागात पावसाची शक्यता आहे असे यामागील विज्ञान देखील त्यांनी सांगितले. परीणामी महाराष्ट्रातील काहीभागात विखुरलेल्या स्वरूपात ५ मिमी पेक्षा कमी पाऊस (Rain) होऊ शकतो. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात होणार नाही असे ही त्यांनी स्पष्ट केले. पावसाबरोबर गारा पडण्याची शक्यता फक्त १० टक्के म्हणजे अत्यंत कमी आहे असे ही शेतकर्यांना गेल्या दहा वर्षापेक्षा अधिक काळापासून विना मोबदला व विनाअनुदानित हवामान अलर्ट व हवामान माहितीची ‘अंदाज नव्हे माहिती!’ ह्या सेवेचे प्रणेते भौतिकशास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांनी मुळीच घाबरू नये कारण पाऊस (Rain) झाला तरी तो लगेच जमिनीत मुरेल व नुकसान होणार नाही. आपला उघड्यावरील अन्नधान्याचा साठा सुरक्षित करावा तसेच नुकसान सोसून ताबडतोब शेतमाल विकण्याचा निर्णय घेऊ नये असे शेतकर्यांना आवाहन देखील प्रा. जोहरे (Prof. KiranKumar Johare) यांनी केले आहे.