सर्वात वर

Spice Jet : नाशिकहून बंगरूळ आणि हैदराबाद आता एक तासात

बातमीच्या वर

नाशिक ओझर विमानतळावरून Spice Jet विमानसेवेचा शुभारंभ

नाशिकमधील उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी विमानसेवा उपयुक्त ठरेल -पालकमंत्री छगन भुजबळ 

नाशिक – नाशिक वरून आता बंगरूळ व हैदराबादला जाण्यासाठी आता जवळपास एक तासाचा वेळ लागणार आहे कारण उडान योजनेअंर्तगत नाशिक येथून आजपासून  बंगरूळ व हैदराबाद विमान सेवा सुरु झाली आहे.या विमान सेवेमुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार असून या विमानसेवे मुळे देशातील महत्त्वाची शहरे जोडली जाणार असल्याने उद्योग व पर्यटनाच्या वाढीसाठी  सुरू झालेली विमानसेवा खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री छगन भुजबळ तसेच माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी ओझर विमान तळावरून प्रवासी वाहतुकीसाठी टर्मिनस ची उभारणी करण्यात आली होती.ओझर विमानतळावरून आजपासून सुरू झालेल्या स्पाईस जेट विमानसेवेच्या उदघाटन  पालकमंत्री श्री. छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, प्रांताधिकारी संदीप आहेर, मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीएच. वी. शेषगिरी राव, एचएएलचे जनरल मॅनेजर दीपक सिंगल, साकेत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

आजपासून विमानसेवेच्या माध्यमातून बंगरूळ व हैदराबाद ही शहरे नाशिक जिल्ह्याला जोडली गेली आहेत, या गोष्टीचा आनंद नाशिक जिल्ह्याला होत आहे. याचप्रमाणे यापुढेही दिल्ली, अहमदाबाद तसेच इतरही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा नाशिक येथून सुरू होणार आहेत. उद्योजकांना त्यांच्या उद्योगांच्या वाढीसाठी वाहतुकीच्या सोयी सुविधा असणे आवश्यक असते. याअनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील उद्योजक दुसऱ्या राज्यात जाऊन परराज्यातील तसेच परदेशातील उद्योजकांना देखील आपल्या जिल्ह्यात त्यांचे उद्योग व्यवसाय वाढून रोजगार निर्मीती होण्यास देखील मदत होणार आहे. विमानसेवांमुळे जिल्ह्यातील उद्योग व पर्यटन व्यवसाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाऊन त्यांची वाढ होण्यासाठी चालना मिळणार आहे.

मुंबईला जाण्यासाठी चौपदरी रस्ता व उड्डाणपुल असल्याने नाशिकहून मुंबईला काही तासातच पोहचता येत असल्याने नाशिक मुंबई प्रवास करणारे प्रवासी याठीकाणी कमी आहेत.आजपासून सुरू झालेली ही विमानसेवा सातत्याने सुरू राहणे आवश्यक आहे, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक येथे उद्योग, शिक्षण, पर्यटनासाठी लोकांना विमानसेवेमुळे येणे सहज शक्य होणार आहे. याचसोबत नाशिक येथील शेती उत्पादनाला देखील देश विदेशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विमानतळाचा लाभ सर्वांना होणार असल्याने येत्या काही वर्षात लवकरच इतर विमानतळांप्रमाणेच नाशिकहून देशात व परदेशात जाण्यासाठी विमानसेवा सुरू होतील. आणि या विमान सेवांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.   दिवाळीचा सण व थंडीचे हवामान या वातावरणाचा विपरीत परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून काही ठिकाणी रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी याकाळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. या अनुषंगानेच कोरोनाचा वाढणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याचा विपरीत परिणाम या विमान सेवांवर होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

आपल्या जिल्ह्यातून विमानसेवा सुरू होण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. नाशिकमधून सुरू झालेल्या सर्व विमानसेवांचा समावेश उडाण योजनेअंतर्ग करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असाही विश्वास मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Ozar Airport: Schedule
बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली