सर्वात वर

SpiceJet : आता भारतात कुठे करा ८९९ रुपयात विमान प्रवास : स्पाइस जेटची भन्नाट ऑफर

मुंबई – कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते.हळूहळू आता हि स्थिती पूर्वपदावर येत चालली असली तरी अद्याप कोरोनाचा धोका कमी झाला नाही.याच कोरोनाच्या काळात विमान प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी स्पाइस जेटने (SpiceJet) एक स्पेशल ऑफर आणली आहे. देशांतर्गत प्रवास करण्यासाठी आता स्पाइस जेट ने ८९९ रुपयांचे तिकीट उपलब्ध करून दिले आहे. 

त्यामुळे नाशिक मध्ये सुरु असलेल्या स्पाइस जेटच्या (SpiceJet) विमानसेवेमुळे आता नाशिकहून दिल्ली,बंगरुळु आणि हैदराबाद या शहरांमध्ये प्रवाशांना ८९९ रुपयात विमान प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. हि विशेष ऑफर १३ जानेवारी ते १७ जानेवारीच्या दरम्यान तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. तिकीट बुक केल्यानंतर प्रवासाचा कालावधी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर असा असणार आहे.या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशानाच या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. 

स्पाइस जेट कंपनीने आपल्या  ट्विटर हँडलवरून  या सेलबाबतची  माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे फक्त देशांतर्गत प्रवासासाठीच ही ऑफर आहे. Book Befikar Sale अंतर्गत बुक केलेल्या तिकीटाची तारीख प्रवासी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदलू शकणार आहे. किंवा रद्दही करु शकतात.

याशिवाय विमान प्रवासाचे  तिकीट बूक केल्यानंतर कंपनीकडून एक मोफत तिकीट व्हाउचरही दिलं जाणार आहे. हे तिकीट व्हाउचर जास्तीत जास्त १००० रुपयांचं आहे. हे व्हाउचर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंतच  वैध राहणार आहे. फक्त देशांतर्गत उड्डाणांवर हे व्हाउचर लागू असेल. या व्हाउचरला किमान ५,५०० रुपयांच्या व्यवहारासाठी वापरता येईल असे हि स्पष्ट करण्यात आले आहे.कंपनीने Book Befikar Sale बाबत आपल्या www.SpiceJet.com या संकेतस्थळावर सविस्तर माहिती दिली आहे.