सर्वात वर

स्पृहा जोशीने केलं नाशिकच्या शेतक-याचं कौतुक

आपल्या व्लॉगमधून दिला आरोग्याचा खास सल्ला

सामाजिक जाणिवा जपणारी आणि साहित्यं, संस्कृती, कला यांसारख्या विषयांवर रसिकांशी भरभरून बोलणारीसर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Spruha Joshi). स्पृहाने केलेले नाटक, चित्रपट ,मालिका किंवा तिने केलेले निवेदनाचे कार्यक्रम अथवा स्पृहाच्या युट्युब चॅनेलवरचे कविता वाचनासारखे खास उपक्रम या सर्व माध्यमातून संवाद साधताना आपल्याला जाणवत राहतं ती तिच्यातील आपुलकीची भावना. लॉकडाऊनच्या काळातही स्पृहाने सोशल मीडियाचा वापर करुन अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. 

विविध विषयांवर चर्चाही केली. छान छान कविताही वाचल्या. स्पृहा या आठवड्यात कोणती कविता ऐकवणार याबद्दल तिच्या फॅन्सच्या मनातही उत्सुकता असते. परंतु याआठवड्यात स्पृहाने कविता नाही तर एक सामाजिक संदेश आपल्या व्लॉगमधून दिलाय आणि हा हा संदेश म्हणजे कोरोनाच्या काळात अनेकांना घरपोच भाजीपाला, धान्य, फळे पुरविणा-या नाशिकच्या अमोल गो-हे या कृषितज्ज्ञ असलेल्या शेतक-याच्या सामाजिक कार्याविषयीचा.

काय म्हणाली स्पृहा ?

स्पृहा (Spruha Joshi) व्लॉगमधून सांगते आहे कि आपण भाजी पाला घेताना ती दिसायला कशी हिरवीगार आहे एवढंच बघतो पण ती योग्य दर्जाची आहे कि नाही  याचा विचार क्वचितच करतो.आपल्याला मिळणारा भाजीपाला आलातरी कुठून ? हा भाजीपाला कशा पद्धतीने पिकवला आहे  ? कुठे धुतलाय ? असे प्रश्न आपल्याला कधी पडतात का ? भाज्यांच्या, फळांच्या फ्रेश रंगाला भुलून न जाता त्या भाज्या आणि फळे आतून किती आरोग्यदायी आहेत, आपल्या आरोग्याला उपायकारक आहेत याचा आपण विचार करणे गरजेचे आहे.

असाच  खात्रीशीर, आरोग्यासाठी पोषक भाजीपाला मिळण्यासाठी तिने अमोल गोऱ्हे यांच्या कार्याचा दाखला दिलाय.अमोल गोऱ्हे यांच्या ग्रिनफिल्ड एग्रो सर्विसेस कंपनीच्या मार्फत थेट शेतातून आपल्या घरात ताजा भाजीपाला, ताजी फळे पोचवण्याची सेवा देण्यात येत आहे. ऑरगॅनिक पद्धतीने हा भाजीपाला पिकवला जातो आणि हे भाजीपाला फळे योग्य दरात ग्राहकांना ऍपवर उपलब्ध आहे. अमोल गो-हेची ग्रिनफिल्ड एग्रो सर्विसेस ही सेवा आता ठाणे आणि मुंबई मधील काही भागांमध्ये सुरू आहे. ग्रिनफिल्ड एग्रोची हि सेवा घेण्याचं आवाहनही स्पृहाने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

कोण आहेत अमोल गो-हे ?

कोरोना काळात जनजीवन ठप्प झाले होते तेव्हा जवळपास संपूर्ण देश थांबला होता याचवेळी अनेक कोव्हिड योद्धे न थकता, न थांबता अविरतपणे आपली सेवा सर्वसामान्यांना पुरवत होते. नाशिकचे अमोल गो-हे ही यांपैकीच एक.कृषी तज्ज्ञ असलेले गो-हे कोणता भाजीपाला योग्य दर्जाचा आहे ? तो भाजीपाला कशा पद्धतीने पिकवला गेलाय ? तो कसदार जमिनीत पेरला होता का? हा भाजीपाला पिकवण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर करण्यात आला का ? या सर्व विषयांमध्ये अमोल गो-हे तज्ज्ञ आहे.

अमोल गो-हे 

गेल्या अनेक वर्षांपासून ते कृषिक्षेत्रासाठी मोलाचं योगदान देत आहेत आणि नाशिकसह परिसरातील शेतक-यांना मदतीचा हातही देत आहेत.अमोल गो-हेंनी कोरोना काळात मुंबई, नवी मुंबई , ठाण्यात आपल्या ग्रीनफिल्ड ऍग्रो कंपनीच्या माध्यमातून ताजा, स्वच्छ भाजीपाला, फळे, धान्य तसेच  बचतगटांच्या महिलांनी बनवलेले पापड, लोणचे स्वस्त दरात घरपोच पोहचवण्याचं महत्वाचे काम केलं आहे. 

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा ठाण्यामध्ये घरोघरी जाऊन वृत्तपत्र वाटप करणा-या मुलांच्या नोक-या गेल्या आणि त्या वृत्तपत्र विक्रेत्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला. तेव्हा अमोल गो-हेनी त्यातील अनेकांना वृत्तपत्र विक्रेत्यांना आपल्या या घरपोच सेवा देण्याचा उपक्रमात सहभागी करुन त्यांना रोजगार मिळवून देण्याचं कामही केलं. त्यांच्या या कामाची दखल घेत अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कार हि करण्यात आला .एक्सप्रेस ग्रुप सारख्या माध्यमसमुहाने त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान केला तसेच दस्तुरखुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली. 

अमोल गो-हेंच्या कार्याविषयी अभिनेत्री स्पृहा जोशीला (Spruha Joshi) माहिती मिळाली ती सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्याकडून. शेती आणि शेतकरी हे विषय अरविंद जगताप यांच्या किती जिव्हाळ्याचे आहेत हे त्यांच्या आजवरच्या कामातून सर्व रसिक प्रेक्षकांना बघायला मिळालं आहे.अरविंद जगताप यांच्याकडून ही माहिती मिळाल्यावर स्पृहाची या कामाबद्दलची उत्सुकता वाढली आणि ग्रीनफिल्डचा भाजीपाला स्पृहानेही आपल्या घरी मागवला आणि हा भाजीपाला स्पृहाला फार आवडला असं ती या व्हिडियोमध्ये म्हणतेय.

त्यामुळेच हा व्लॉग करुन त्यांच्या कामाची माहिती पोहचवण्याचा निर्णय स्पृहाने घेतला अशी माहिती ही तिने यामधून दिली. या व्लॉगला समाजमाध्यमातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून यानिमित्ताने स्पृहाने एक चांगले पाऊल उचलले आहे अशा आशयाच्या प्रतिक्रियाही या व्लॉगखाली अनेकांनी दिल्या आहेत.

Spruha Video Link – 

https://fb.watch/3aegwhbYL0/