सर्वात वर

स्टार प्रवाहवर नव्या वर्षात सुरु एक नवा कार्यक्रम

Star Pravah – घरोघरी जाऊन सासू सुनेचं गमतीशीर नातं घेऊ समजून…

मराठी परंपरा, स्टार प्रवाह (Star Pravah)वाहिनीने प्रेक्षकांची मनं अल्पावधीत रसिक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नवनव्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणारी स्टार प्रवाह(Star Pravah) वाहिनी नव्या वर्षातही असाच एक नवाकोरा कार्यक्रम घेऊन रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घरोघरी जाऊन सासू सुनेचं गमतीशीर नातं समजवून घेऊन रसिकांचे मनोरंजन करणारा हा कार्यक्रम आहे.

कार्यक्रमाचं नाव आहे ‘सून सासू सून’. घरा घरातील सासु सुनेचं नातं म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच असतं . सासु सुनेचं हेच गमतीशीर नातं या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडा होणार आहे.

विशेष म्हणजे या कार्यक्रमात फक्त फक्त सुसंवाद असणार आहे. कुठेही घरातील कलह, कुरबुरी आणि मतभेद नसतील. सासू- सुनांमध्ये हा सुसंवाद घडवून आणण्याचं महत्वापूर्ण काम सुप्रसिद्ध अभिनेता पुष्कार श्रोत्री करणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण महाराष्ट्राभर पसरलेल्या कुटुंबाला भेटण्याचं काम कार्यक्रमाच्या माध्यमातून पुष्कर करणार आहे.

नव्या वर्षातल्या या नव्या पर्वणीबद्दल बोलतांना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सासू आणि सून हे नातं अनोखं आहे. घराचे घरपण जपणाऱ्या या सासूसुनां आपल्या कुटुंबात कधी मैत्रीणी असतात तर कधी मायलेकी. कधीतरी या दोघांमध्ये कुरबुर असते पण ती क्षणिक. अश्या हळुवार नाती जपणाऱ्या दोघींना भेटुन समजून थोडा छान वेळ घालवता येईल असा का कार्यक्रम आहे.’असे हे सांगतात नव्या वर्षातला नवा कार्यक्रम सून सासू सून ११ जानेवारीपासून सायंकाळी ५.३० वाजता स्टार प्रवाह (Star Pravah)वर रसिकांच्या भेटीला येणार आहे.