सर्वात वर

अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पार पडणार ?

आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक – अनघाच्या साखरपुड्याची धामधूम

मुंबई -स्टार प्रवाह (Star Pravah) वरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची धामधूम सुरु झाली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आला आहे .अभिवरचे खुनाचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर त्याच्या आयुष्याची आता नव्याने सुरुवात होणार आहे. 

अभिषेक-अनघाच्या साखरपुड्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. नाचगाण्यांचा धमाल कार्यक्रमही रंगणार आहे. देखमुख कुटुंबातलं हे हसतं खेळतं वातावरण आणखी किती काळ टिकणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. कारण संजनारुपी वादळ या कुटुंबावर दबा धरुन बसलेलं आहेच. त्यामुळे अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा निर्विघ्न पाह पडणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

आई कुठे काय करते मालिकेचे नवेकोरे आणि धमाकेदार एपिसोड्स सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर(Star Pravah) रसिकांना बघता  येणार आहे.