सर्वात वर

‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतून नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

अक्षया हिंदळकर आणि संचित चौधरीची हटके केमिस्ट्री

स्टार प्रवाहवर (Star Pravah) २१ डिसेंबरपासून  ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही नवी मालिका सुरु होतयं स्टार प्रवाहावर सुरू असलेल्या  मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. स्टार प्रवाहावरील या नव्या मालिकेच्या निमित्ताने अक्षया हिंदळकर आणि संचित चौधरी ही नवी जोडी रसिक  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

अक्षयाने कुलस्वामिनी आणि साता जल्माच्या गाठी या स्टार प्रवाह (Star Pravah) वरील दोन मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. तर संचितने ही स्टार प्रवाहावरील प्रेमाचा गेम सेम टु सेम या मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतील ही नवी व्यक्तिरेखा साकारण्या साठी अक्षया आणि संचित प्रचंड उत्सुक आहेत.

या नव्या मालिकेतील व्यक्तिरेखेविषयी बोलतांना अक्षया म्हणाली, ‘मी या मालिकेत स्वाती ही व्यक्तिरेखा साकारते आहे. स्वाती प्रचंड कष्टाळू मुलगी आहे. साधा आणि मनमिळाऊ स्वभाव , नम्र, सर्वांशी प्रेमाने वागणारा आणि नऊ ते पाच नोकरी करणारा नवरा हवा अशी तिची इच्छा असते. मात्र स्वातीवर जीवापाड प्रेम करणारा रघू मात्र याच्या परस्पर विरोधी स्वभावाचा असतो .

रघू एकच ब्रीदवाक्य “फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो”हे वाक्य घेऊन मनमौजी जगणारा रघु . असे विरुद्ध स्वभावाचे स्वाती आणि रघू एकमेकांच्या प्रेमात पडणार का हे मालिके मध्ये रसिकांना कळणार आहे ? ही  गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही नवी मालिका.

या मालिकेच्या निमित्ताने संचित आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. मी थोडी अबोल असल्यामुळे शूटिंगच्या पहिल्या दिवशी संचित सोबत काम करताना आम्ही फार बोललो नाही. मात्र आता आमची खूप छान मैत्री झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने संचितच्या रुपात मला एक चांगला मित्र भेटलाय.असे ही अक्षयाने सांगितले. 

संचित चौधरी आपल्या भूमिके विषयी सांगताना म्हणाला, स्टार प्रवाह वरील नवी मालिका आणि नवं पात्र साकारताना मनस्वी आनंद होतो आहे. मालिकेची कथा आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना प्रेमात पडायला लावेल असंच आहे.

रघू मनमौजी जगणारा असला तरी स्वातीवर जीवापाड प्रेम करणारा असतो. रघू त्याच्या प्रेमात यशस्वी होणार का हे मालिका जशी पुढे पुढे जाईल तसे हळुहळु उलगडेलच. पण माझा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्की आवडेल अशी आशा आहे. स्वाती आणि रघूची खूप छान केमिस्ट्री प्रेक्षकांना या नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पहायला मिळेल. स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ही नवी मालिका तुझ्या इश्काचा नादखुळा २१ डिसेंबरपासून रात्री १०.३० वाजता रसिकांच्या भेटीला येत आहे.