सर्वात वर

Star Pravah : कीर्ती जिंकू शकेल का जीजी अक्कांचं मन ?

स्टार प्रवाहवरील(Star Pravah) ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत कीर्तीचा पहिला संक्रांतीचा सण होणार साजरा 

मुंबई – स्टार प्रवाहवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका  ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत संक्रांतीचा सण साजरा होणार आहे.कीर्तीची हा पहिलीच संक्रांत असल्यामुळे हलव्याचे दागिने, काळी साडी अशी साग्रसंगीत तयारी करण्यात आली आहे. परंतु जीजी अक्कांनी कीर्तीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. या पंधरा दिवसांत जर कीर्ती स्वत:ला सिद्ध करु शकली नाही तर तिला घर सोडून जावं लागणार आहे अशी आत आहे.

कीर्तीसाठी हे १५ दिवस निर्णायक असणार आहेत. या पंधरा दिवसासाठी दिलेली मुदत याआधीच सुरु झालं आहे. त्यामुळे कीर्तीकडे आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी आता अवघे काहीच दिवस उरले आहेत.

संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या तीळगुळाच्या गोडीप्रमाणेच नात्यातलाही गोडवा वाढवणाऱ्या या सणाचं विशेष महत्त्व आहे.संक्रांतीचा सण म्हणजे नात्यामधील झालेले हेवेदावे विसरायला लावणारा दिवस. कीर्तीच्या या पहिल्या संक्रांतीच्या सणाच्या मुहुर्तावर कीर्ती जीजी अक्कांचं मन जिंकू शकेल का हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे.