Star Pravah:विनोदवीरांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी होणार हास्याची आतषबाजी

मुंबई-स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीने दिवाळीच्या मुहूर्तावर सुरु होणाऱ्या ‘कॉमेडी बिमेडी’ या नव्या कार्यक्रमाची रसिकांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे. दिवाळीच्या फळाला सोबत विनोदाची खमंग मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.आशिष पवार, दिगंबर नाईक,अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे, शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे हे १६ विनोदवीर आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
१५ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सुप्रिया पाठारे, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, अतुल आणि सोनिया परचुरे हे खास गेस्ट असणार आहेत.या भागाचं सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे आणि कविता लाड-मेढेकर.करणार आहेत
एक तासाच्या या भागात विनोदवीरांच्या जोड्या धमाल विनोदी स्कीटचं सादरीकरण करतील. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणत्याही स्वरुपाची स्पर्धा नसेल त्यामुळे शोमध्ये परीक्षण नाही आणि परीक्षण नसल्यामुळे इथे परीक्षकही नाहीत.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सूत्रसंचालकही नसेल. त्यामुळे विनोदवीरच थेट प्रेक्षकांशी संवाद साधतील. १५ नोहेंबरला ‘कॉमेडी बिमेडी’ हा कार्यक्रम रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर (Star Pravah)रसिकांना बघता येईल
