सर्वात वर

Star Pravah : ‘सांग तू आहेस का’ मालिकेची टीम कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर

Star Pravah : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर,शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरीची यांची विशेष उपस्थिती 

Star Pravah वरील मालिका ‘कॉमेडी बिमेडी’आणि ‘सांग तू आहेस का’ या दोन्ही कार्यक्रमांना रसिक प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमांमधील कलाकार नुकतेच एका मंचावर आले आणि त्याचे निमित्त होतं ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाच्या विशेष भागाचं. 

या विशेष भागात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर,अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यांनी हजेरी लावत भन्नाट विनोदाच्या मेजवानीचा आनंद लुटला.आशिष पवार आणि आरती सोळंकी यांनी या निमित्ताने एक विशेष स्किट सादर करत हास्याची तुफान फटकेबाजी केली. 

या धमाल विनोदी स्किटचं सादरीकरण पाहून सिद्धार्थ चांदेकर आणि संपूर्ण टीमने भरभरून आनंद घेतला आणि त्यांनी कॉमेडी बिमेडीच्या टीमचं विशेष कौतुक केलं.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत.स्टारप्रवाहावरील कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न आहे. विनोदाचं अफलातून टायमिंग आणि भन्नाट विनोदी किस्से जर अनुभवायची संधी रसिकांना ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाचा या आठवड्यातील शनिवार आणि रविवारच्या भागात मिळणार आहे.