सर्वात वर

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत होणार मोठ्या ज्योतिबाची एण्ट्री

दख्खनचा राजा ज्योतिबा’ या स्टार प्रवाह वरील मालिकेत आतापर्यंत छोट्या ज्योतिबाचं मालिकेत दर्शन होत होतं. आता लवकरच मोठ्या ज्योतिबाची मालिकेत एण्ट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. अभिनेता विशाल निकम मोठ्या ज्योतिबाच्या भूमिकेत दिसणारआहे.या भूमिकेसाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. आता ही मालिकाअतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

ज्योतिबाच्या भव्यदिव्य रुपाबरोबर यमाई आणि चोपडाई यांच्या देखिल अवताराची गोष्ट मालिकेमध्ये उलगडणारआहे.त्यामुळे ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचे यापुढील भाग भक्तीरसाने परिपूर्ण असे असतील.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता विशालने कमी कालावधीत विशाल घोडेस्वारी करायला शिकला आहे. या सोबतच विशालने ज्योतिबा भूमिकेसाठी १२ किलो वजनही वाढवलं आहे. विशाल मूळचा सांगलीचा असल्यामुळे कोल्हापुरी भाषेचा लहेजा त्याला आपसुकच येत होता. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेच्या यापुढील प्रवासासाठी विशाल कमालीचा उत्सुक आहे.दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका रसिक प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता बघता येणार आहे.