सर्वात वर

बजेट आधीच शेअर बाजारात मोठी घसरण

विश्वनाथ बोदडे ,नाशिक

(Stock Market News )मागील चार दिवसांपासून बाजारातील नफा वसुली थांबायला तयार नाही ,ऑन एव्हरी राईज देअर इस सेल्लिंग ,काही दिग्गज कंपन्यांचे ती माही निकाल उत्तम आणि अपेक्षेपेक्ष्या चांगले येत आहेत तरी सुद्धा बाजारात नफा वसुली दिसत आहे. काल २६ जानेवारी असल्याने भारतीय शेअर बाजार बंद होते परंतु आंतरराष्ट्रीय शेअर बाजार(Stock Market) सुरू होते,तेथे काल नकारात्मक सूर होते , त्याचाच परीणाम आज सकाळी भारतीय शेअर बाजारात बघायला मिळला .

सकाळी बाजार उघडले तेव्हा SENSEX 280 अंकांनी आणि NIFTY 81 अंकांनी नकारात्मक उघडले काही काळ चढ उतार दिसले पण प्रत्येक बिउन्स बॅक ला विक्री बघायला मिळत होती, त्याचा परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक SENSEX  937 अंकांनी घसरून  47409  ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय  शेअर बाजाराचा (Stock Market) पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY सुद्धा  271 अंकांनी घसरून  13967 ह्या पातळीवर बंद झाला तर बारा BANKING SHARES चा निर्देशांक NIFTY BANK सुद्धा तब्बल 913 अंकांनी घसरून    30284  ह्या पातळीवर बंद झाला. 

तसे बघितले तर काही दिग्गज कंपन्यांचे निकाल चांगले आलेत ,त्याच बरोबरच IMF ने 2021 साठी भारताचा GDP दर चांगला राहील असे संकेत दिले आहेत तरी सुद्धा बाजारात आज जोरदार नफा वसुली दिसली ,मागील चार दिवसात NIFTY 677, SENSEX 2391 तर NIFTY BANK 2258 अंकांनी घसरले आहेत. याला मुख्य कारण म्हणजे बाजार उंच स्तरावर पोहचला होता त्यामुळे वरच्या स्तरावरुन नफा वसुली अपेक्षित होती.

येत्या 1 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, प्रत्येक वर्षी असे होते की, बजेट सादर झाला की शेअर बाजार खाली येतो ह्या वेळेस काय होते ते बघणे आवश्यक आहे असे बाजारातील सूत्र सांगत आहेत. 

NIFTY १३९६७ – २७१

SENSEX  ४७४०९ – ९३७

BANK NIFTY ३०२८४ – ९१४%


आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स  

TECHM ९९७.५५ + ३%

SBI LIFE ८८४ + २%

WIPRO ४४६ + २%

ITC २११ + २%

ULTRACEMCO ५४३० + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TATAMOTOR २६७ – ५%

TATA STEEL ६२४ – ४%

TITAN १४३७ – ४%

INDUSINDBK ८१५ – ४%

HINDALCO २३१ – ४%

यु एस डी  आय एन आर $ ७३.२०५०

सोने १० ग्रॅम           ४८७८०.००

चांदी १ किलो         ६५८००.००

क्रूड ऑईल             ३८५४.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे ,नाशिक

Mobile -8888280555