सर्वात वर

शेअर बाजारात तेजीला ब्रेक : अदानी ग्रुपवर प्रेशर कायम

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

जागतिक स्तरावरील संमिश्र संकेतांचा आधारीत सकाळी भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) नकारात्मक उघडला आणि ही नकारात्मकता शेवटपर्यंत बाजारात बघायला मिळाली , आजच्या सत्रात बाजारामध्ये मेटल क्षेत्रांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसली तर आयटी आणि ग्राहक उपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये काही प्रमाणात खरेदी सुद्धा बघायला मिळाली परंतु स्मॉल कॅप आणि मिडकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये वरच्या स्तरावरून नफा वसुली बघायला मिळाली,त्याचाच परिणाम म्हणून बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 271 अंशांनी घसरून 52 502 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 102 अंकांनी घसरून 15 768 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक 244 अंकांनी घसरून 35 003 या पातळीवर बंद झाला.

बाजारामध्ये आज सकाळपासून सेलिंग प्रेशर त्याचबरोबर नफा वसुली दिसत होती त्याच बरोबर अदानी ग्रुप ऑफ कंपनीज च्या समभागांमध्ये लॉवर सर्किट बघायला मिळालेत ,मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या तेजीला आज काही प्रमाणात ब्रेक मिळाला असे बाजारातील जाणकार सांगत आहेत.

1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा ज्या सुचिता दलाल या पत्रकाराने बाहेर आणला होता त्यांनीच मागील आठवड्यात असे सूचित केले होते की 2021 मध्ये शेअर मार्केटमध्ये वेगळ्या घोटाळ्याची त्यांच्या ट्विट द्वारे सुचित केले होते परंतु त्यांनी कोणत्याही ग्रुप अथवा कंपनीचे नाव लिहिले नसतांना बाजारामध्ये अदानी ग्रुप ऑफ कंपनीज च्या शेअर्समध्ये मागील तीन दिवसांपासून विक्री बघायला मिळत आहे , आज हे समभाग लोवर सर्किट ला होतें, कारण फॉरेन इन्वेस्टरस फंडस् यांचे तब्बल 43000 करोड चे शेअर्स गोठवण्यात आले होते असे  नमूद केल्यामुळे या शेअर्स वर विक्रीचा जोर दिसत असला ,तरी यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे.

आज डॉलरच्या मुकाबल्यात रुपया मजबूत दिसला तर धातु बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या किमती मागील काही दिवसापासून कमी अधिक स्थिर असला तरी खाली येताना दिसत आहेत त्याच बरोबर क्रूड ऑइल दररोज एक नवीन उच्चांक गाठत आहे त्यामुळे देशभरामध्ये इंधनाचे दर सुद्धा वाढताना आपल्याला दिसत आहे याचा परिणाम दळणवळण यावर होईल आणि महागाई सुद्धा वाढू शकते असे जाणकार म्हणत आहेत.

NIFTY १५७६८ – १०२

SENSEX ५२५०२ – २७१ 

BANK NIFTY ३५००३ – २४४  

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

TATACONSUM ७३५ + २%

NESTLEIND १७९५१ + २%

ONGC १२७ + १%

NTPC ११९ + १%

HINDUNILVR २४०७ + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

ADANIPORTS ७०२ – ८%

TATA STEEL ११४० – ३%

HINDALCO ३८० – ३%

JSW STEEL ७०७ – ३%

POWRGRID २४२ – २%

यु एस डी  आय  एन आर $ ७३.४१००

सोने १० ग्रॅम         ४८२००.००

चांदी १ किलो       ७१५५०.००

क्रूड ऑईल           ५३००.००

विश्वनाथ बोदडे, नाशिक 

संपर्क – 8888280555