सर्वात वर

भारतीय निर्देशांक विक्रमी स्थितीत : SENSEX ची ५०५ अंकांनी उसळी

विश्वनाथ बोदडे,नाशिक

मागील तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज जागतिक स्तरावरील संमिश्र संकेतांच्या आधारे भारतीय बाजार सकाळी हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडले कारण काल भारतीय शेअर बाजारात सुट्टी होती परंतु अमेरिकन बाजारात चांगलेच  चढ उतार बघायला दिसले होते . परंतु आज पासून सेबी ने मार्जिन संबधी जे नवीन नियम लावले त्याचा परिणाम F&O  SEGMENT मध्ये दिसला , आणि CASH SEGMENTS मध्ये चांगल्या प्रकारे VOLUME बघायला मिळला आज तसे बघितले तर बाजाराला लीड केले PSU BANKING ने त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस संमभागांचा निर्देशांक SENSEX तब्बल 505 अंकांनी वधारून 44655 ह्या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास संमभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 140 अंकांनी वधारून 13109 ह्या पातळीवर बंद झाला तर NIFTY BANK सुद्धा 208 अंकांनी वधारून 29818 वर बंद झाला.

बाजारात आज पासून सेबीने नवीन मार्जिन नियम आमलात आणलेले आहेत याला PEAK MARGIN असे संबोधले आहे याचा नुसार आता CASH SEGMENT मध्ये INTRADAY ला सुद्धा मार्जिन आबश्यक असणार आहे, याचा सरळ परीणाम F&O वर TURNOVER सुद्धा होऊ शकतो करण तेथे सुद्धा मार्जिन वधारल्या आहेत. 
बाजाराचे जाणकार सांगत आहेत की, कोविड लसी आता अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे बाजाराला अजून उभारी येत आहे पण बाजार उंची स्तरावर असल्याने गुंतवणूक करतांना सेलेक्टिव्ह असणे गरजेचे आहे. 

NIFTY १३१०९ + १४०

SENSEX  ४४६५५ + ५०५

BANK NIFTY २९८१८ + २०८

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

GAIL १११ + ८% 

SUNPHARMA ५४१ + ६% 

INDUSINDBK ९०० + ५%

TECHM ९१२ + ४% U P L ४३४ + ४%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

NESTLE IND १७४३० – ३%

KOTAL BANK १८७९ – २%

TITAN १३४३.५० – २%

BAJFINANCE ४८६० – १%

HDFC BANK १४२७ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.८७००

सोने १० ग्रॅम         ४८५५०.००

चांदी १ किलो       ६१८००.००

क्रूड ऑईल           ३३४४.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे,नाशिक

Mobile-888820555