सर्वात वर

शेअर बाजारात तेजीची आतषबाजी :Sensex ४३२७७

बातमीच्या वर

जागतिक स्तरावरील संकेतांचे आधारे भारतीय शेअर बाजारात दिवाळीच्या आधीच दिवाळीचा जल्लोष बघायला मिळला आहे. मागील सात  दिवसात NIFTY 987 अंकांनी, SENSEX 3662 अंकांनी आणि BANK NIFTY 4702 अंकांनी वाढलेले आहेत याचा अर्थ बाजार सर्व संकटे बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न आतापर्यंत तरी करतांना दिसत आहे. 

आज सकाळी भारतीय शेअर बाजार ग्लोबल मार्केट च्या संकेतांच्या आधारे  SENSEX 228 अंकांनी तर NIFTY 62 अंकांनी सकारात्मक उघडले. बाजार उघडला तेव्हापासूनच BANKING आणि FINANCE क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात मागणी  दिवसभर दिसली आणि त्याचाच परीणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक ६८० अंकांनी वधारून ४३२७७ ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY १७० अंकांनी वधारून १२६३१ ह्या पातळीवर स्थिरावला तर NIFTY BANK सुद्धा तब्बल १०७१ अंकांनी वधारून २८६०६ ह्या पातळीवर बंद झाला. आजच्या बाजारच्या लांबीचा विचार केला तर १२०३ समभाग सकारात्मक दिसले तर १४५७ “समभाग नकारात्मक होते तर १७२ शेअरमध्ये कोणताही बदल दिसला नाही.

आज बाजाराला उंच स्तरावर नेण्यास प्रामुख्याने आघाडीवर होते BAJAJ FINANCE, INDUSIND BANK, L&T, BAJAJ FINSERVE आणि HDFC हे होते तर CIPLA, TECH MAHINDRA, HCL TECH, DIVIS LAB ह्या शेअरमध्ये विक्री सुद्धा बघायला मिळली.
काल रात्री अशी बातमी आली होती की PFIZER कंपनी कोविड वर लस तयार केली आहे आणि त्यामुळे अमेरीकेतील शेअर बाजार उंच स्तरावर होते परंतु बंद झाले तेव्हा काही प्रमाणात नकारात्मक बंद झाले होते त्याच बरोबर गोल्ड आणि सिल्व्हर यावर उलट परीणाम दिसला होता, परंतु सकाळी सिंगापूर NIFTY सकारात्मक असल्याने भारतीय शेअर बाजार सुद्धा सकारात्मक उघडले होते. 

बाजारातील जाणकार सांगत आहेत की , नवीन गुंतवणूकदारांनी सध्या गुंतवणूक करतांना सावध पवित्रा ठेवावा आणि बाय ऑन डीप चे तंत्र अवलंबवावे.


NIFTY १२६३१ + १७०

SENSEX  ४३२७७ + ६८०

BANK NIFTY  २८६०६ + १०७२

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

BAJAJ FINANCE ४२१० + ९% 

INDUSIN BANK ८३२ + ७% 

L&T १०३२ + ७%

BAJAJ FINSV ६६५८ + ६%

SBIN २३२ + ६%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

TECHM ८२३ – ६%

CIPLA ७२२ – ६%

HCL TECH ८१२ – ५%

FIVES LAB ३२७० – ५%

NESTLE IND १६६६९ – ४%

यु एस डी  आय  एन आर $ ७४.३५२५

सोने १० ग्रॅम           ५०४००.००

चांदी १ किलो         ६२१००.००

क्रूड ऑईल             ३०२९.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदडे

विश्वनाथ बोदडे,नाशिक Mobile-8888280555

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली