सर्वात वर

फार्मा, इन्फ्रा आणि एफएमसीजी क्षेत्राच्या नेतृत्वात बाजार उच्चांकी पातळीवर

मुंबई, : फार्मा, इन्फ्रा आणि एफएमसीजी क्षेत्राच्या नेतृत्वातआठवड्याच्या सुरुवातीला प्रगतीचा वेग कायम ठेवत बाजाराने नवा उच्चांक गाठला. Bse Sensex ३४७.४२ अंकांनी वाढला व ४५४२६.९७ अंकांवर स्थिरावला. तसेच Nifty ९७.३० अंक किंवा ०.७३% नी वाढला व १३३५५.८० अंकांवर स्थिरावला.  Finance, Pharma and FMCG स्टॉक्सनी बाजाराला मजबूत आधार दिला. पीएसयू बँकेचा निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला तर फार्मा, इन्फ्रा आणि एफएमसीजीच्या स्टॉक्समध्ये प्रत्येकी १ टक्क्यांची वाढ झाली.

BSE Midcap आणि स्मॉलकॅपनेही प्रत्येकी १ टक्क्यांची वृद्धी दर्शवली.

Angel Broking Ltd चे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात सर्वाधिक वृद्धीचा कल कायम ठेवत निफ्टीतील टॉप गेनर्समध्ये युपीएल (४.५६%), अदानी पोर्ट्स (३.५९%), एचयुएल (३.२४%), Bharti Airtel (३.१९%) आणि Coal India (२.५५%) चा समावेश झाला. टॉप लूझर्समध्ये Kotak Mahindra Bank(१.३६%), JSW Steel (१.३२%), नेस्ले (१.४४%) आणि SBI Life (१.५१%) चा समावेश झाला.

शेअर्सचा विचार करता, १९७२ शेअर्स सकारात्मक स्थिरावले, ९३६ शेअर्स नकारात्मक तर १९० शेअर्स स्थिर राहिले.

सर्वंकष पुनरावलोकन: HUL, HDFC, ITC आणि Icici Bank ने निफ्टीतील नफ्यात निम्म्यापेक्षा जास्त वाटा उचलला. अदानी एंटरप्रायजेसमध्ये तीव्र उलथापालथ दिसून आली. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयने देखील निफ्टी बँकेला नफा मिळवून दिला. तर HDFC बँकेने नकारात्मक कामगिरी करत नफ्यावर मर्यादा आणल्या. निफ्टी मीडियानेदेखील उत्तम खरेदीचा अनुभव दिला. झी एंटरटेनमेंट आणि सन टीव्हीनेही मोठी वृद्धी दर्शवली.

सर्वोच्च पातळीवर असूनही, लसीची प्रगती, आर्थिक सुधारणा, FII मध्येही मजबूत प्रवाह दिसून आल्यामुळे नजीकच्या काळात देशांतर्गत बाजारात जोरदार प्रगतीची अपेक्षा आहे. प्रत्येक विभागात वर्तुळाकार सहभागाद्वारे खरेदीचा उत्साह दिसून आला. विशेषत: स्टॉकचा विचार करता, योग्य नफा मिळतो, त्यामुळे या बाबतीत पुढाकार घेण्याचा सल्ला देता येईल.

जागतिक आउटलुक: जागतिक आघाडीवर, ब्रिटन आणि युरोपियन संघा दरम्यानच्या Brexit नंतरच्या व्यापारी करारामुळे युरोपियन स्टॉक्सवर परिणाम होत आहे. त्यात काहीशी अस्थिरता आहे. आशियाई बाजारात, Hang Seng आणि Nikkei चे स्टॉक्स अनुक्रमे १.२३% आणि ०.७६% घटले. तर केओएसपीआयने ०.५१% ची वृद्धी अनुभवली.