सर्वात वर

भारतीय शेअर बाजारात नवा उच्चांक

विश्वनाथ बोदाडे,नाशिक 

भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) आज अजून एक नवा उच्चांकाची नोंद झाली. सकाळी आतंरराष्ट्रीय संकेतांच्या आधारे भारतीय शेअर बाजार SENSEX 210 अंकांनी तर NIFTY 65 अंकांनी सकारात्मक उघडले होते. आज बाजार अपेक्षेप्रमाणे VOLATILE राहिला परंतु बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक  SENSEX  154 अंकांनी वधारून 46253  ह्या पातळीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा पन्नास समभागांचा निर्देशांक NIFTY 44 अंकांनी वधारून 13558 ह्या पातळीवर स्थिरावला तर NIFTY BANK सुद्धा 141 अंकांनी वधारून 30746 ह्या पातळीवर बंद झला.

2003 नंतर पहिल्यांदा असे झाले आहे की, डिसेंबर महिन्यात प्रथमच एक दिवस वगळता सर्व दिवस सकारात्मक बंद झालेला आहे.अमेरिकेत जरी प्रोत्साहन पर पॅकेज बद्दल मागे पुढे होत असले तरी तेथील आणि भारतीय बाजार सकारात्मक रूप दाखवत आहेत, एकीकडे स्थानिक वित्तीय संस्था(DII) नफा वसुली करत आहेत पण विदेशी (FII) आपला पैसा भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत, बाजारातील तज्ञ असेही म्हणत आहेत की, जर स्थानिक वित्तीय संस्थेच्या मार्फत विक्री झाली नसती तर आज भारतीय शेअर बाजार या पेक्षा उंच स्तरावर दिसला असता.नुकत्याच आलेल्या सर्व्ह मध्ये LIC ने आता पर्यन्तचा सर्वात जास्त नफा1 वसूल केला आहे. 
आजच्या बाजाराच्या लांबीचा विचार केला तर 1769 समभाग सकारात्मक होते तर 1009 समभाग नकारात्मक दिसले आणि 131 समभागांमध्ये कोणताही बदल दिसला नाही.ऑटो क्षेत्र सोडले तर सर्वच क्षेत्र सकारात्मक बंद झाले पण यामध्ये आघाडीवर होते मेटल आणि PSU BANK INDEX . 


NIFTY १३५५८ + ४४

SENSEX  ४६२५३ + १५४

BANK NIFTY ३०७४६ + १४१%

आज निफ्टी मधील  वधारलेला शेअर्स 

O N G C १०२ + ६% 

L T १२४५ + ४% 

CIPLA ७८७ + ४%

COAL INDIA १४४ + ४% 

I O C ९६ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

EICHERMOT २४०८ + ३%

HETOMOTOCO ३११४ + २%

M & M ७१३ + २%

HDFC LIFE ६५५ + २%

TECHM ९०८ + १%

यु एस डी  आई एन आर $ ७३.६७२५

सोने १० ग्रॅम         ४८७३५.००

चांदी १ किलो       ६३०००.००

क्रूड ऑईल            ३४५७.००

Vishwanath Bodade
विश्वनाथ बोदाडे,नाशिक